Homeताज्या बातम्या

राहुरीत मुसळधार पावसाने पूर्व भागात शेतीचे नुकसान

देवळाली प्रवरा :राहुरी तालुक्यातील पूर्व भागात सततच्या झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी पाथरे

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत
लायन्स क्लब कोपरगावतर्फे 100 कुटूंबाना दिवाळी फराळाचे वाटप
थोरात- तांबे यांचा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा

देवळाली प्रवरा :राहुरी तालुक्यातील पूर्व भागात सततच्या झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी पाथरे, खुडसरगांव, माहेगाव, कोपरे, शेणवडगाव, तिळापुर, वांजुळपोई आदी भागातील नुसकानग्रस्त पिकांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पहाणी केली आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा मोरे यांनी दिला आहे.सततच्या पावसामुळे काळा पडलेला कापुस राहुरीचे तहसिलदार नामदेवराव पाटील यांच्या पायाशी ओतला.
राहुरी तालुक्यामधे गेल्या आठ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार झालेल्या या पावसाने विषेशतः काढणीला आलेल्या कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सोयाबीन, मुग, कांदा रोपे, चारा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे काळा पडलेला कापुस शेतकर्‍यां समवेत घेवून थेट तहसिल कार्यालयाचे आवार गाठले.काळा पडलेला कापुस राहुरीचे तहसिलदार नामदेवराव पाटील यांच्या पायाशी ओतला. हा कापुस विक्रीसाठी लायक आहे का? असा प्रश्‍न करुन आमच्या भावना सरकार पर्यंत पोहचवा.असे मोरे यांनी तहसिलदार पाटील यांना सांगितले. त्यामुळे ऐन सनासुदिच्या तोंडावर शेतक-यांसमोर आस्माणी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्‍यां समवेत पाहणी केली आहे. तात्काळ शासनाने या ठिकाणी पंचनामाचे आदेश करून आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा येणार्‍या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे. यावेळी सतिश पवार, प्रमोद पवार, आप्पासाहेब देठे, किशोर जाधव, भैय्या जगताप, आप्पासाहेब जाधव, सिताराम जाधव, सुधाकर जगताप, नानासाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, कैलास जाधव, एकनाथ पवार, लक्ष्मण जगताप, गणेश डोंगरे, आप्पासाहेब पवार,बाळासाहेब कोळपे,रामकृष्ण जगताप, संदीप जगताप, बजरंग पवार, रावसाहेब तुवर आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS