ठाणे / प्रतिनिधी : ठाणे, डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वार्यासह वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील 3 ते 4 तास वार्याचा वेग ताशी 50
ठाणे / प्रतिनिधी : ठाणे, डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वार्यासह वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील 3 ते 4 तास वार्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच अहमदनगर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
डोंबिवलीमध्ये गेल्या काही वेळापासून अचानक वादळाला सुरुवात झाली. काही ठिकाणी वादळासह पाऊसही सुरू झाला. त्याचवेळी बदलापूरमध्ये जोरदार वार्यासह पावसाला सुरूवात झाली. या ठिकाणच्या पावसाचा वेग हा 107 किमी इतका असल्याचे सांगितले जाते.
पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वार्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
COMMENTS