Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अतिवृष्टीचा इशारा

पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे ः वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल झाला असून, मान्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापून काढला आहे. श

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता
हैदराबादमध्ये पावसाचा धुमाकूळ

पुणे ः वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल झाला असून, मान्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापून काढला आहे. शनिवारी रात्री मुंबई आणि पुणे शहराला चांगलेच झोडपून काढल्यानंतर आता पुढील 48 तासांत राज्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यातच सिंदुधदुर्गाला रेड अलर्ट तर विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात आणि मुंबईमध्ये झालेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील 48 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या काही तासांतच मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबईत ठीकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, कुलाबा, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली. पुढील 3-4 तास मुंबईत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर तशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे हवामान खात्याने आवाहन केले. शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. आता राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे.

पुण्यात पावसामुळे दाणादाण – पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. धंगेकर म्हणाले की, आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या 50 वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,क ारण पाऊसच जास्त झाला असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS