Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी

सातारा / प्रतिनिधी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि. 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशा

कोल्हापूरात तिसर्‍या लाटेत रुग्णसंख्या दीडपटीने वाढणार
शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप
कृषी वीजबिल थकबाकीच्या 50 टक्केसवलतीसाठी राहिले फक्त 19 दिवस


सातारा / प्रतिनिधी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि. 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहिर केली आहे.
शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. तसेच इयत्ता 10वी व 12 वीच्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

COMMENTS