संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस

शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी ; शेतकऱ्यांची मागणी या सर्व ढगफुटी सदृश पावसाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर प्रतिनिधी / संगमनेर तालुक्यातील पठारभागत लोणी मुसळधार भागात पाऊस झाला आहे . या  पावसामुळे संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ गावचा अन्य वाड्यावस्ता

राज्यात अतिवृष्टीचा इशारा
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

अहमदनगर प्रतिनिधी / संगमनेर तालुक्यातील पठारभागत लोणी मुसळधार भागात पाऊस झाला आहे . या  पावसामुळे संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ गावचा अन्य वाड्यावस्तांशी संपर्क तुटला आहे. या परिसरातील कोठे बुद्रुक,खंदरमाळ,बोरबन,वनकुटे येथे मुसळधार पाऊस झालेला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात झालेल्या पावसाने  अनेक रोड पाण्याखाली गेलेले आहेत तसेच मका,बाजरी,सोयबीन,वटाना,झेंडु व आदी पिकांचे नुस्कान झाले आहे. शेतपिकांत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता शासनाने तातडीने  पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे. एकूणच या सर्व ढगफुटी सदृश पावसाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

COMMENTS