Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरजगाव परिसरात जोरदार पाऊस : सिना नदीला महापूर 

मिरजगाव : मिरजगाव परिसरात मागील काही दिवसा पासून जोरदार पाऊस सुरू असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . सततच्या पावसामुळे सिना धरण पूर्ण भरले अ

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे तर १५ वर्षे मुदतीचे १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महावितरणचा लकी डिजिटल पहिला ड्रॉ जाहीर ; २३० वीजग्राहकांना स्मार्ट फोन, स्मार्टवॉच मिळणार
अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे : मंत्री प्रताप सरनाईक
Displaying 1004084258.png

मिरजगाव : मिरजगाव परिसरात मागील काही दिवसा पासून जोरदार पाऊस सुरू असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . सततच्या पावसामुळे सिना धरण पूर्ण भरले असून सांडव्या वरून २१०१४ विसर्ग चालू आहे . त्यामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत असून सिना नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन सीना मध्यम प्रकल्प  निमगाव गांगर्डा तालुका कर्जत जलसंपदा विभागाने दिला आहे.

     सीना नदी व कडी नदीला महापूर आल्यामुळे नागलवाडी सांगवी ला जोडणारा बंधारा एका साईटने फुटला असून या दोन गावांचा संपर्क तुटला आहे . तसेच ढगी ओढ्याला व शंभर ओढ्याला पूर आल्यामुळे नागलवाडी मिरजगाव हा ही संपर्क तुटला आहे . सीना नदीवरील अनेक ठिकाणचे बंधारे फुटले असून शेतात व अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे . अनेकांनी स्थलांतर केले असून लोक बेघर झाले आहेत . गेल्या ५० – ६० वर्षात असा नदीला महापूर आला नसल्याचे जाणते लोक सांगत आहेत . सिना नदीकडे च्या शेकडो एकर जमिनीवरील माती पिकासह वाहून गेली असून मोटार पंप , पाईपलाईन वाहून गेल्या आहेत . अनेक विहिरी बुजल्या गेल्या आहेत . सततच्या पावसामुळे शेतात पाणी साठले असून पिक  पाण्याखाली गेले आहेत . पिकाचे पंचनामे करणे चालू आहेत . मात्र आता सर्वच पिके पाण्याखाली गेल्यामुळे कोण – कोणत्या पिकाचे पंचनामे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे .

    संपूर्ण राज्यालाच आधी अवकाळीने व नंतर मोसमी पावसाने झोडपून काढले आहे तर आता परतीचा पाऊस ही  धुवांधार बरसत असून सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे . शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून आता कोणतेच पिक वाचणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घेऊन संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी समस्त शेतकरी करीत आहेत .

COMMENTS