Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाबळेश्‍वर तालुक्यात मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी परिसरात रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानं स्ट्रॉबेरीचे उत्पादक शेतकर्‍यांचे कंबरडेमोडले आहे. पावसाच्या या अस्मानी संकटाने

व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी
शिवशाही सरपंच संघाकडून स्व. शिवाजीराव देसाई आदर्श ग्रामसह आदर्श सरपंच पुरस्कार

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी परिसरात रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानं स्ट्रॉबेरीचे उत्पादक शेतकर्‍यांचे कंबरडेमोडले आहे. पावसाच्या या अस्मानी संकटाने स्ट्रॉबेरी शेती पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. याचबरोबर वाटाणा आणि बटाटा पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.
परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा फटका बसला असून, सततच्या पावसाने अगोदरच शेतकर्‍यांना स्ट्रॉबेरीची लागवड करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. काही शेतकर्‍यांनी अद्याप लागवड केली नाही. बर्‍याचदा दिवाळीत स्ट्रॉबेरी विक्रीचा प्रारंभ अनेक शेतकरी करतात. परंतू यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली अजूनही काही शेतकरी लागवड करत आहेत.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने या स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. भिलार, गुरेघर, भोसे, खिंगर, राजपुरी, आंब्रळ, मेटगुताड, पांगारी परिसरात स्ट्रॉबेरी शेतीत पाणी साचलेने शेतकरी आर्थिक संकटात हंगामापूर्वीच सापडले आहेत. त्यामुळे या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

COMMENTS