Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच

कोकणात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई-कोकणात सुरू असलेला मुसळधार पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात देखील कोसळत असल्याचे दिसून येत आहे. कोकणामध्ये अनेक नद्यांना पूर आ

आदीवासींना न्याय मिळवून दिला ः डामोर
कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होउ देउ नका
महिलेच्या पर्समधील सव्वा लाख पळवले

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई-कोकणात सुरू असलेला मुसळधार पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात देखील कोसळत असल्याचे दिसून येत आहे. कोकणामध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे, तर रायगड जिल्ह्यात दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सावित्री, वाशिष्टी, अंबा अशा काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाची संततधार सुरू असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून विदर्भात जोर कायम आहे. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, या भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पावसाचा फटका बसला. मुंबईत लोकल विस्कळीत झाल्याने हाल झाले. भांडूपमध्ये घराचा स्लॅब कोसळून 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर भिवंडीत 14 वर्षीय मुलगी वाहून गेली. विदर्भातील चिखलदरा तालुक्यातील मोरगड शिवारात वीज पडून सुनील (32) व नीलेश भास्कर (20) हे काका-पुतणे ठार झाले. धुळे जिल्ह्यात पावसामुळे विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि संततधार सुरू आहे. किनारपट्टीच्या तालुक्यांत वादळी वारा आणि पावसाचा जोर अधिक आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे रायगड येथे एका गावावर दरड कोसळून शेकडो लोक ढिगार्‍याखाली अडकले आहेत. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले आहेत. या जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून बुधवारी सायंकाळी 6:00 वाजता राजाराम बंधार्‍याची पाणीपातळी 26 फूट 3 इंच झाली होती. (पंचगंगा नदी इशारा पातळी-3900’ व धोका पातळी-4300’) एकूण 44 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. नदी -नाले ओसंडून वाहत आहेत. पंचगंगा नदीचे पाणी रात्री कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडू शकते. जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

कोल्हापूरमधील 76 गावांना धोक्याचा इशारा – रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून अनेकजण ढिगार्‍याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत अनेकांच्या कुटूंब उद्धस्त झाले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरमधील 76 गावांना भूस्खलनचा धोका असल्याचे समोर आले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्रोने केलेल्या सर्वेक्षणातून देशात भूस्खलनचा धोका असलेल्या 147 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली, या यादीत कोल्हापूरातील 76 गावांचा समावेश आहे. यामध्ये राधानगरी (31 गाव), शाहूवाडी (20 गाव) आणि भुदरगड तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे.

COMMENTS