Homeताज्या बातम्यादेश

राज्यासह देशात उष्णतेची लाट तीव्र

राजस्थान हरियाणात तापमान 47 अंशांच्या पुढे

नवी दिल्ली ः देशामध्ये सध्या अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट असा दुहेरी खेळ चांगलाच रंगतांना दिसून येत आहे. मात्र आता अवकाळीचा जोर ओसरला असून, देशाम

योगेश्वरी संस्थेत दोन दिवसीय विज्ञान प्रयोग खेळणी कार्यशाळा संपन्न
आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच टाकले गटारीचे पाणी | LOK News 24
श्रीगोंद्यात सात जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली ः देशामध्ये सध्या अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट असा दुहेरी खेळ चांगलाच रंगतांना दिसून येत आहे. मात्र आता अवकाळीचा जोर ओसरला असून, देशामध्ये बुधवारी उष्णतेची लाट तीव्र असल्याचे दिसून येत होते. महाराष्ट्रासह, राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमानाचा नवा उच्चांक नोंदवण्यात आला.
देशातील राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमान 47 अंशांच्या पुढे गेले असून, हरियाणातील सिरसा येथे कमाल तापमान 47.8 अंश आणि राजस्थानच्या पिलानी येथे 47.2 अंश होते. तर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात तापमान 44 अंशांची नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसानंतर आलेल्या या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत होतांना दिसून येत आहे. त्यातच हवामान विभागाने पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देतांना हवामान विभागाचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, राजस्थानमध्ये पुढील 5 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसवरून 47 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब आणि हरियाणामध्ये तापमानात घट झाली आहे. मात्र, येथील तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे. पुढील पाच दिवस उत्तर प्रदेशात रेड अलर्ट तर मध्य प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पुढील 2-3 दिवसांत 12 सेमीपर्यंत पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळ आणि माळवा-निमारमध्ये दिवसाचे तापमान 45 अंशांच्या वर आहे. मध्यप्रदेशात देखील 24 ते 25 मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात असेल. उत्तर प्रदेशात विचित्र हवामान आहे. पूर्व उत्तर प्रदेशात गडगडाटी वादळ आणि पावसाचा इशारा असताना, हातरस, आग्रा आणि मथुरा यासह पश्‍चिम उत्तर प्रदेशातील 19 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आग्रा दुसर्‍यांदा देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या श्रेणीत सामील झाले आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात उष्णतेची लाट – महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, अकोला, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच दिवसा व रात्री देखील हवामान दमट व उष्ण राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस कमी होऊन, गुरुवारपासून (दि.23) तापमानात वाढ होईल असा इशारा ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.

COMMENTS