Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

भोकर । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच भोकर शहरात श

शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू
माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.
अजित पवारांसह 9 आमदारांचे निलंबन

भोकर । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच भोकर शहरात शोककळा पसरली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अत्यंत शोकाकुल वातावरणात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते नागनाथ घिसेवाड, पत्रकार एल. ए. हिरे, नागोराव शेंडगे, शिवाजी लगलूदकर, मिर्झा ताहेर बेग, महिला तालुका अध्यक्षा यशोदाबाई शेळके, चंद्रकला गायकवाड, सुरेश कावळे, शकुंतला देशमुख, माजी नगरसेवक जवादोद्दीन बरबडेकर, रज्जाक शेठ, पत्रकार अनिल डोईफोडे, शेखर कुंटे, शिवसेनेचे नेते सुभाष नाईक यांच्यासह बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत अजितदादांना

COMMENTS