Homeताज्या बातम्यामनोरंजन

आलिया भट्टच्या वडिलांवर हृदयशस्त्रक्रिया

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असणारं एक कुटुंब म्हणजे भट्ट कुटुंब होय. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणां

संगमनेर तालुक्यात कुंटनखान्यावर छापा
अश्‍लील चॅटिंग प्रकरणी भाजप आमदाराविरूद्ध गुन्हा
अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असणारं एक कुटुंब म्हणजे भट्ट कुटुंब होय. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या भट्ट कुटुंबाबाबत एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेत्री आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आलिया भट्टचा भाऊ राहुल भट्टने या बातमीवर शिक्कामोर्तब करत महेश भट्ट यांची हेल्थ अपडेट दिली आहे. गेल्या महिन्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हार्ट चेकअपमध्ये काही तक्रारी दिसून आल्या होत्या. त्यांनतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चार दिवसांपूर्वी महेश भट्ट यांच्यावर हृद्य शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत आता त्यांचा मुलगा आणि आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्टने प्रतिक्रिया देत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

COMMENTS