Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारगिल युद्धातील अनुभव ऐकून उपस्थित गहिवरले..!

जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेने केले कारगिल युद्धातील शहिदांना अभिवादन

अंबाजोगाई प्रतिनिधी - येथील जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेने 24 व्या कारगिल विजय दिवस निमित्त शहिद भारतीय जवानांना अभिवादन केले. संस्था परिसरात य

साहित्यातून मिळते विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेण्याचे सामर्थ्य – डॉ. प्रकाश कोल्हे  
 गेवराई तहसीलवर 10 जुलै रोजी काढण्यात येणार्‍या संविधान अधिकार मोर्चास उपस्थित रहा – धम्मपाल कांडेकर
भक्तांच्या रक्षणार्थ नृसिंह महाराजांचा अवतार ः सुराशे महाराज

अंबाजोगाई प्रतिनिधी – येथील जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेने 24 व्या कारगिल विजय दिवस निमित्त शहिद भारतीय जवानांना अभिवादन केले. संस्था परिसरात युद्ध स्मारक स्तंभावर संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप यांच्या हस्ते रित परेड करण्यात आला. या परेडनंतर कारगिल युद्धामध्ये शहिद झालेल्या वीर सैनिकांना त्यांच्या अतुलनिय कार्याच्या स्मृती जागवत आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे तर व्यासपीठावर जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेच्या उपाध्यक्षा महानंदा पोखरकर, सचिव अभिमन्यू शिंदे, सहसचिव आबासाहेब हाके, कोषाध्यक्ष पुंडलिक गव्हाणे, संचालक बाबासाहेब केंद्रे, सज्जाद हुसेन, चंद्रकांत विरगट यांच्यासह भरत पांचाळ, शिवाजी ठोंबरे, सय्यद खाजा नजिमोद्दीन, यशवंत व्हावळे, कुंडगर, जोगदंड, शिवाजी गंगणे, अच्युतराव लाखे, माणिक काचगुंडे, अनिल भुईटे, अनंत शेप, सर्जेराव सिरसठ, दिलीप निकम, संभाजी वाघमारे, शंकर रत्नपारखी यांच्यासह संस्था वसाहती मधील 143 पुरूष व 71 महिला भगिनी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सुभेदार आबासाहेब रंगनाथ हाके यांनी त्यांचा कारगिल युद्धातील अनुभव कथन केला. विविध प्रसंग उभे केले. आपल्या अनुभवातून त्यांनी उपस्थितांना कारगिल युद्धातील विविध प्रसंग सांगितले. या प्रसंगी उपस्थित महिला, पुरूष यांचे  डोळे भरून आले, मन गहिवरले, प्रारंभी संस्थेचे सचिव कॅप्टन अभिमन्यु शिंदे यांनी कारगिल युद्धाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. तर संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग शेप यांनी कारगिल युद्ध का, कसे व कोणत्या कारणामुळे घडले. हे सांगुन कठीण परिस्थितीत भारतीय सैन्याने आपले मनोधैर्य न खचू देता शत्रुशी दोन हात केले., प्रखर लढा दिला व शौर्याचे धाडस दाखवून विजय संपादन केला. ही गाथा म्हणजे कारगिल विजय दिवस होय. या युद्धात शौर्य गाजविणार्या सर्व भारतीय सैनिकांना अभिवादन करीत असल्याचे कॅप्टन पांडुरंग शेप यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने मानण्यात आले.

COMMENTS