पुणे ः पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता य

पुणे ः पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता येत्या 12 ऑगस्टला पुन्हा ही सुनावणी होणार आहे. यापूर्वी तिने पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने तिचा हा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तिने आता दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. तर दुसरीकडे तिचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधातही पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकूपूर्व जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल केली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने 1 ऑगस्ट रोजी पूजा यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र आता ही सुनावणी लांबणीवर पडली असून 12 ऑगस्टला होणार आहे. दरम्यान, खेडकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS