नगरमध्ये हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान

अहमदनगर/प्रतिनिधी : प्रजासत्ताक शासन प्रणाली मध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय संसदेने जारी

पुणतांबा रेल्वे प्रश्‍नांवर खासदार वाकचौरे यांची घेणार भेट ः कुलकर्णी
*कोरोनाची औषधं आणि लसीवर जीएसटी कर का गरजेचा? पहा १२च्या १२ बातम्या | LokNews24*
वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

अहमदनगर/प्रतिनिधी : प्रजासत्ताक शासन प्रणाली मध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय संसदेने जारी केला आहे. भारतीय लोकशाहीमध्ये मतदारांना जात आणि धर्माच्या नावावर फसवून किंवा कोंबडी, दारु, पैश्याची लालूच दाखवून मागच्या दाराने सत्ता मिळवणार्‍या सत्तापेढार्‍यांना घरचा रस्ता दाखाविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा उत्कृष्ट शासन-प्रशासन राबविणारा उमेदवार पुढे आणून ऑपरेशन पर्याय निर्माण केला जाणार आहे. जे उमेदवार मतदारांना विकत घेतात, ते देश विकल्याशिवाय राहणार नाही. ही बाब प्रत्येक मतदाराच्या मनावर बिंबवण्यासाठी हे अभियान कार्य करणार असल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या अभियानासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भोंगा, हनुमान चालीसा, शेंडी शेंदूर, मंदिर, मस्जिदला प्राधान्य दिले जात आहे. महागाई, बेकारी, झोपडपट्टी निर्मूलन, गरिबी हटवा या सगळ्या योजना दिल्लीपासून गल्लीपर्यंत डब्यात गेल्या आहेत, असा आरोपही अ‍ॅड. गवळी यांनी केला.

COMMENTS