Homeताज्या बातम्याकृषी

चोपडा तालुक्यात ज्वारी काढणीला सुरुवात, पावसाचं वातावरण पाहून शेतकरी ज्वारी काढण्यात मग्न 

जळगाव प्रतिनिधी - गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याप्रमाणे चोपडा तालु

यंदा आंब्यांच्या झाडांना प्रचंड मोहोर
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
माण तालुक्यात सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

जळगाव प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याप्रमाणे चोपडा तालुक्यात देखील गेल्या काही दिवसापूर्वी वादळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतातील पीक जमिनीवर भुईसपाट झाले. या पावसाच्या वातावरणामुळे शेतात उभे असलेले काढणीला आलेले पीक शेतकरी काढण्यासाठी धडपड करीत आहेत. चोपडा तालुक्यात ज्वारीची लागवड बऱ्यापैकी केली जात असल्याने ज्वारी आता काढणीला आलेली आहे. मात्र, अवकाळी पावसाच्या भीतीने व हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे शेतकरी आता ज्वारी काढण्यामध्ये मग्न आहेत. वातावरणाच्या बदलामुळे येणारे उत्पन्न यात देखील मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. आता मार्केटमध्ये ज्वारीला काय भाव जातो हे देखील माहित नाही, मजुरी खर्च भरपूर काढणीचा खर्च भरपूर आहे, जे उत्पन्न यायला पाहिजे होतं ते उत्पन्न आता निम्म्यावर आलं असल्याने शेतकरी देखील आता जे येईल त्याच्यावर समाधान मानताना दिसत आहेत. जर का अवकाळी पाऊस आला त्या पावसामुळे शेतातील काढणीला आलेले पीक हे देखील खराब होईल आणि त्याला भाव कमी मिळेल या भीतीपोटी शेतकरीराजा आता शेतातील पीक काढण्यात मग्न दिसत आहे. 

COMMENTS