केज । प्रतिनिधीकेज नगरपंचायत च्या घरकुल घोटाळा प्रकरणी आमदार नमिताताई मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न मांडल्याबद्दल गटनेते हारूणभाई इनामदार यांनी आ
केज । प्रतिनिधी
केज नगरपंचायत च्या घरकुल घोटाळा प्रकरणी आमदार नमिताताई मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न मांडल्याबद्दल गटनेते हारूणभाई इनामदार यांनी आमदार नमिताताई मुंदडा यांचे आभार मानले तर सदर घरकुल घोटाळा प्रकरणातील सर्व दोषीवर लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी शासनाकडे पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
सन 2020-21 मध्ये केज नगरपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल घोटाळा झालेला आहे या घरकुल घोटाळा प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या घरकुल घोटाळा प्रकरणी केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून या घरकुल घोटाळ्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. या घरकुल घोटाळ्यातील दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आ. नमिताताई मुंदडा यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार नमिताताई मुंदडा यांच्या भूमिकेचे स्वागत करून त्यांनी सदर घरकुल घोटाळा प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी केल्याबद्दल आमदार नमिता ताई मुंदडा यांचे सर्व नगरसेवक व केजवासीयांच्या वतीने नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व गटनेते हारूणभाई इनामदार यांनी आभार व्यक्त केले. पुढे बोलताना इनामदार म्हणाले की, सदर घरकुल घोटाळा हा सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या घरकुल घोटाळ्यामुळे अनेकांचे स्वप्न भंग झाले असून सामान्य जनतेला घरकुलचा लाभ मिळणे गरजेचे आहे. आमदार नमिताताई मुंदडा यांनी संबंधित दोषीवर कारवाई करण्याची योग्य मागणी केली आहे त्यांच्या मागण्यानुसार संबंधित दोषीवर शासनाने तात्काळ कारवाई करावी. यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड म्हणाल्या की, या घरकुल घोटाळा प्रकरणात जी यंत्रणा सामील आहे अशा सर्व दोषीवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून सामान्य जनतेला न्याय द्यावा. या घरकुल घोटाळ्यामुळे सर्वसाधारण नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की, सदरचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नसून तो पूर्वीचाच आहे.

COMMENTS