Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावच्या हर्षा बनसोडेचा थायलंडमध्ये डंका

कोपरगाव शहर :थायलंडमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2024 या स्पर्धेत कोपरगावच्या हर्षा कल्याणी शैलेंद्र बनसोडे हिने सहभाग नों

प्रा. सचिन गायवळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
संकट काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज – पद्मश्री पोपटराव पवार.
कालिका फर्निचरच्या ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ

कोपरगाव शहर :थायलंडमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2024 या स्पर्धेत कोपरगावच्या हर्षा कल्याणी शैलेंद्र बनसोडे हिने सहभाग नोंदवत तृतीय क्रमांक प्राप्त करत भारतासह कोपरगावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे तसेच बेस्ट टॅलेंट अवॉर्ड व क्वीन ऑफ हार्टस अवॉर्ड हे सर्वोच्च दोन पुरस्कार मिळवत नावलौकिक मिळविला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील के.जे. सोमैय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे यांची कन्या हर्षा थायलंडमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आपला नावलौकिक मिळवला आहे या स्पर्धेत जगभरातील 40 देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी भारतात झालेल्या स्पर्धेत ती मिस हेरिटेज इंडिया म्हणून विजयी झालेली होती या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व करत असताना सर्वांची मने जिंकली होती. या स्पर्धेसाठी तिला अविनाश निकम, सुधीर डागा, जगताप फार्मर्स, संजीवनी अकॅडमी, तसेच राघोबा दादा वाड्याचे सोनवणे, अनिल गिड्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर तिचा या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

COMMENTS