Homeताज्या बातम्यामनोरंजन

हार्दिक-अक्षयाची थाटामाटात साजरी झाली पहिली मंगळागौर

मुंबई प्रतिनिधी - श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र मंगळागौर खेळाची चर्चा सुरू होते. सध्या अनेक मालिकांमध्ये मंगळागौर खेळाचे स्पेशल एपिसोड्स टेलिकास

स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर टॉम हॉलंड भावूक | LOKNews24
टीडीएम’ या सिनेमाला शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत.
पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र मंगळागौर खेळाची चर्चा सुरू होते. सध्या अनेक मालिकांमध्ये मंगळागौर खेळाचे स्पेशल एपिसोड्स टेलिकास्ट केले जात आहेत. गेल्या वर्षी २ डिसेंबरला हार्दिक- अक्षय या क्यूट कपलने लग्नगाठ बांधली होती. आपल्या लग्नानंतरची पहिली मंगळागौर नुकतीच यांनी साजरी केली आहे. लग्नानंतरची पहिली मंगळागौर म्हटलं की नववधु साठी तो खेळ काही तरीच खास असतो. सध्या त्यांचा मंगळागौर खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खास मेहंदी काढतानाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिच्या मंगळागौर खेळीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली मंगळागौर काल साजरी केली. मंगळागौर साजरे करतानाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान दोघांच्याही लूकबद्दल बोलायचे तर, हार्दिक- अक्षयाने सोनेरी रंगाचा मॅचिंग ड्रेस परिधान केला होता. सोबतच, दोघांनी घरी महादेवाची आलिशान सजावट करुन विधिवत पूजा केली. यावेळी अक्षया आणि हार्दिकचे नातेवाईक या खास सोहळ्याला उपस्थित होते.

COMMENTS