Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिश्रम, संस्कार व सकारात्मकता आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

प्रमाणिकपणे काम करणार्या कर्मचार्यांमुळे संस्थेची मान उंचावते - डॉ.दीपाताई क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - नवगण शिक्षण संस्था राजुरी (न) मधील काही मुख्याध्यापक, प्राध्यापक, सहशिक्षक या पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याप्

सामान्य नागरिकांना ‘ विचारतेय ‘ कोण ? 
प्रसिद्ध बंगाली अभिनेत्याचं निधन
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जुलैला ?

बीड प्रतिनिधी – नवगण शिक्षण संस्था राजुरी (न) मधील काही मुख्याध्यापक, प्राध्यापक, सहशिक्षक या पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याप्रित्यार्थ सौ.के.एस.के. महाविद्यालयात सेवा निवृत्त झालेल्या कर्मचार्यांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार समारंभाचा सेवा गौरव समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे होते तर प्रमुख अतिथी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.दीपाताई क्षीरसागर यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पुढील प्रमाणे जाधव शिवाजी सौदागर (मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रम शाळा नाळवंडी), तांदळे राजाभाऊ महादेव (सहशिक्षक, जीवाचीवाडी हायस्कूल जिवाचीवाडी), प्रा. नागरे शेषराव भुजंगराव, प्रा. टाकणखार रमेश कचरू (वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा जि.बीड) हे नवगण शिक्षण संस्थेतील कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.स्व.काकूंनी संस्थेतील निवृत्त झालेल्या कर्मचार्यांचा सपत्निक सत्कार करण्याची सुरू केलेली परंपरा जपत डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी ती परंपरा पुढे जोपासत संस्थेतील कर्मचार्यांचा सपत्निक  सत्कार सन्मान केला जातो. सेवा गौरव समारंभ प्रसंगी नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते सेवा निवृत्त कर्मचार्यांचा सन्मानपत्र, सपत्नीक संपूर्ण आहेर, श्रीगणेशाची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचार्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की,  परिश्रम संस्कार व सकारात्मकता आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांनी संस्थेने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संस्थेचे नाव उज्वल केले. तुम्ही सेवेतून निवृत्त होत आहात नवगण शिक्षण संस्थेच्या परिवारातून नाही. त्यामुळे यापुढील काळातही संस्थेच्या कामकाजात सहभागी होऊन आमच्या सुखा दुःखात देखील सहभागी राहतील ,असे मत व्यक्त करून निवृत्त कर्मचार्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. दीपाताई क्षीरसागर सेवा गौरव समारंभ प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, नवगण शिक्षण संस्थेतील कर्मचार्यांचे काम अतिशय उल्लेखनीय आहे. संस्थेत प्रामाणिकपणे काम करणार्या कर्मचार्यांमुळेच संस्थेची मान उंचावते. नवगण शिक्षण संस्थेला अतिशय उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी लाभले. निवृत्त कर्मचार्यांचा सपत्निक सत्कार करण्यासाठी सेवा गौरव समारंभ आयोजित करून समाधान वाटते. स्व.काकूंच्या कल्पनेतूनच कर्मचार्यांचे सपत्नीक सत्कार समारंभ आयोजित करायला सुरुवात झाली होती. शिक्षण संस्थेची आवड असल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कशी टिकवता येईल याकडे स्व.काकूंनी कायमच लक्ष दिले.आदरणीय मा. जयदत्त आण्णांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षसाहेब हे संस्थेसाठी मोलाचे कार्य करत आहेत. संस्थेतील कर्मचार्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यातील प्रश्न सोडविण्यामध्ये यश देखील आले आहे. काकूंनी प्रोत्साहन दिल्यामुळेच नवगण शिक्षण संस्थेचे काम सांभाळत आहे. त्यामुळे संस्थेच्या कर्मचार्यांनी देखील संस्थेचे नाव उज्वल कसे करता येईल याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे. संस्था ही आपलं कुटुंब आहे त्यामुळे निवृत्त कर्मचार्यांना संस्थेच्या माध्यमातून आपल्याला बोलावून आपल्या अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन घेत राहू. संस्थेत चांगले काम करणार्या कर्मचार्यांची कायमच कदर केली जाते. निवृत्त झालेल्या कर्मचार्यांनी संस्थेसाठी उत्कृष्ट काम केले याचा मला अभिमान आहे. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना संस्था प्रमुखांच्या हस्ते सत्कार व्हावा असे वाटत असते त्यामुळे संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे आवर्जून सेवा गौरव समारंभासाठी उपस्थित राहून कर्मचार्यांचा सपत्नीक सत्कार सन्मान करतात व भावी जीवनासाठी शुभेच्छा देतात. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांनी यापुढे आपल्या आवडी, छंद जोपासायला हवेत, आनंदी राहायला हवे असे सांगत संस्थेच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.सेवा निवृत्त झालेल्या कर्मचार्यांनी आपल्या सत्कार, सन्मानाबद्दल बोलताना आपल्या सेवा काळातील अनेक आठवणींना उजाळा देत विविध महत्वाचे प्रसंग ज्यामुळे काम करताना मिळालेली ऊर्जा याबद्दल सांगितले. तसेच सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेला कधी विसरणार नसल्याचे सांगत व सर्वांचे आभार मानले. यावेळी निवृत्त झालेले कर्मचारी बोलताना भावनिक झाले होते. उपस्थित मान्यवरांपैकी अनेकांनी आपल्या मनोगतातून सेवा निवृत्त झालेल्या सहकार्यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ.आबासाहेब हांगे, प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, डॉ. विश्वंभर देशमाने  यांच्यासह संस्थेच्या विविध शाखेतील मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS