हरवलेला मुलगा अवघ्या बारा तासात मुंबईत शोधला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरवलेला मुलगा अवघ्या बारा तासात मुंबईत शोधला

अहमदनगर/प्रतिनिधी : सकाळी व्यायाम व पळण्यासाठी मित्रासोबत बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा घरी परत आला नाही. या प्रकरणी तोफखाना पोलिसात फिर्याद दाखल होताच

संगमनेर : भाजपचे ज्येष्ठ नेते भानुदास डेरे यांना अटक
औषधनिर्मितीमध्ये तरुणांना संशोधनाची मोठी संधी : थोरात
सरपंच पूजा सूर्यवंशी यांची ’यशदा’च्या प्रशिक्षणासाठी निवड

अहमदनगर/प्रतिनिधी : सकाळी व्यायाम व पळण्यासाठी मित्रासोबत बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा घरी परत आला नाही. या प्रकरणी तोफखाना पोलिसात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी 12 तासात त्या मुलाचा मुंबईत शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शिक्षक अजिनाथ सुदामा केंदळे (वय 37, रा. साईराम सोसायटी, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) यांचा पुतण्या ओमकार भाऊसाहेब केंदळे (वय 16) व त्यांच्या गल्लीत राहणारा राम गणेश सोनवणे (वय 16 वर्ष) हे दोघे 18 मार्च रोजी सकाळी पळण्यासाठी घरातून निघून गेले. ते परत आले नाही. त्यांचा शोध घेतला असता 19 मार्च रोजी सायंकाळी राम सोनवणे हा पुणे बस स्थानक येथे मिळून आला. परंतु ओमकार न सापडल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस अंमलदार देवीदास आव्हाड, साईनाथ शैलेश गोमसाळे यांच्या पथकाने राम सोनवणेच्या मदतीने मुंबई येथील दादर बस स्थानक परिसरामध्ये ओमकारचा शोधले व त्याला ताब्यात घेत काका अजिनाथ केंदळे यांच्या सुपूर्द केले.

COMMENTS