Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंजनेरी गडावर  हनुमान जयंती उत्सव साजरा. 

नाशिक प्रतिनिधी :-  हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडावर येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. दोन दिवस पौर्णिमा आल्याने अंजनेरी गडावर भाव

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया
कोपर्डीतील युवकाचे अपघाती निधन
Pandharpur : दुकानातून आणलेल्या खाऊमुळे दोन सख्ख्या बहिणींनी गमावला जीव |

नाशिक प्रतिनिधी :-  हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडावर येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. दोन दिवस पौर्णिमा आल्याने अंजनेरी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती..सुमारे 20 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असावा असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहेत.रखरखते ऊन आणि  अंजनेरी गडावरील टोकावरील अंजनी माता हनुमान मंदिरात पहाटे जन्मोत्सव महापूजा झाली. जय बाबाजी परिवाराच्या वतीने हनुमान चालीसा पठाण पारायण सप्ताह भर सुरू होते. प पू शांतिगिरी महाराजांचे प्रवचन झाले. महाप्रसाद झाला. गड रस्ता बाल हनुमान अंजनी माता मंदिर येथे महंत ब्रह्मगिरी महाराजांच्या उपस्थित महापूजा झाली यावेळी भक्त उपस्थित होते. अंजनेरी मोडदरा भागातील हॉटेल व्यवसायिकांच्या वतीने अंजनेरी गडावर भाविकांना मठ्ठा ताक पेय वाटप करण्यात आले. स्तुत्य उपक्रम केला गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी कार्यरत होते. अंजनेरी गावातील सिद्ध हनुमान मंदिरात ही मोठी गर्दी होती.

सन २०२२ मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने सिमेंट च्या पायऱ्या ह्या कमकुवत झालेल्या आहेत तसेच यंदा देखील पाऊसाने जर जोर धरल्यास पुढील हनुमान जन्मोत्सव पर्यंत पायऱ्या खूपच कमकुवत होतील.

अंजनेरी फाटा ते डोंगर माथ्याचा पहिला टप्पा निम्मा अर्धा हा काँक्रीटीकरण झालेला असला तरी काही रस्ता हा नुसताच दगड धोंड्याचा आहेत त्यामुळे टू व्हीलर व फोरव्हीलर यांची चांगलीच अडचण निर्माण झालेली बघावयास मिळाली .

COMMENTS