Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हंडेवाडीच्या युवकाची व्हॉटस अ‍ॅपद्वारे 4 लाखाची फसवणूक

कोपरगाव शहर ः  कष्ट न करता बखळ पैसा कमविण्याच्या नादात अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून मोबाईल फोन मधील तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करत ऑनलाईन लिंक प

खजिन्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक
डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाला एक कोटींचा गंडा
गुंतवणूकीचे आमिष; वृद्धेची पाच लाखांत फसवणूक

कोपरगाव शहर ः  कष्ट न करता बखळ पैसा कमविण्याच्या नादात अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून मोबाईल फोन मधील तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करत ऑनलाईन लिंक पाठवत मोबाईल हॅक करत काही सेकंदात आपली जमापुंजी रिकामी करण्याच्या घटना अथवा अश्‍लील व्हिडिओ कॉल करत युवकांसह चांगल्या प्रतिष्ठित नागरिकांना ब्लॅकमेल करत पैसे उकळण्याच्या घटना  रोजच जगभरात घडत असून असाच एक प्रकार कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील युवकाच्या बाबतीत घडल्याची घटना समोर आली असून तसा गुन्हा देखील कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील रहिवाशी असलेला 25 वर्षीय अक्षय मच्छिंद्रनाथ वाकचौरे या शेतकरी युवकास सोमवार दि 29 जुलै रोजी तो वापरत असलेल्या  मोबाईल मधील 9503590641 या व्हाट्सअपच्या एप्लीकेशन वर एका अज्ञात इसमाने या 9975832746 या व्हाट्सअप नंबरच्या एप्लीकेशन वरून युनियन बँक ऑफ इंडिया या नावाने एपीके नावाचे मोबाईल अ‍ॅप पाठवून त्याद्वारे अक्षय वाकचौरे याचा विश्‍वास संपादन करत त्याचा कडून त्याचा कार्ड व एटीएम कार्ड संपूर्ण माहिती घेऊन त्याचा मोबाईल हॅक करून त्याद्वारे त्या अज्ञात इसमाने अक्षयच्या बँक खात्यावरून वेगवेगळे 4 व्यवहार करत त्याच्या बँक खात्यातून 3 लाख 94 हजार 700 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना अक्षय वाकचौरे या युवकांसोबत घडली असून अक्षयच्या फिर्यादीनुसार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 274/2014 बी.एन.एस 2023 चे कलम चे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4) माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 2000 चे कलम 43 (बी) सह 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करत आहे.

आपण वापरत आसलेल्या मोबाईल फोन मधील वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटद्वारे अनेक फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे प्रत्येक मोबाईल वापरकत्याने काळजीपूर्वक मोबाईल फोनचा वापर करावा.
संदीप कोळी, पोलिस निरीक्षक कोपरगाव तालुका ग्रामीण

COMMENTS