Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी नगरपरिषदेवर धडकला हंडा मोर्चा

मुुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीवर हंडा आणि घागर ठेवत नोंदवला निषेध

oplus_2 पाथर्डी ः शहरासह तालुक्यात दोन महिन्यापासून पाणीबाणी निर्माण झाली असून पालिका प्रशासनाकडून नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठा होत नसल्याने त्यां

रस्त्याची पोलखोल केल्याने सरपंच पतीकडून शिवीगाळ
शेतकऱ्याच्या शेतात सापडली 47 पोती l पहा LokNews24
जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी
oplus_2

पाथर्डी ः शहरासह तालुक्यात दोन महिन्यापासून पाणीबाणी निर्माण झाली असून पालिका प्रशासनाकडून नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी शहरातील अंजठा चौक येथून पाणी द्या पाणी द्या, भ्रष्ट, मुजोर, मस्तवाल, कामचुकार मुख्याधिकार्‍याचा धिक्कार असो असा घोषणा देत पालिकेवर नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, नागनाथ गर्जे यांनी पुढाकार घेत हा मोर्चा आयोजित केला होता.
यावेळी, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर, नागनाथ गर्जे, किसन आव्हाड, प्राध्यापक सुनील पाखरे, गोरक्ष ढाकणे, पप्पू बनसोड, सुरेश डोमकावळे, अर्जुन फुंदे, विकास नागरगोजे, सुरेश ढाकणे, मनोज गांधी, कृष्णा पांचाळ, बाळू केळकर, दिलीप आंधळे, श्रीधर हंडाळ, भगवान बांगर, देविदास चव्हाण, सुरेश हुलजुते, सचिन नागापुरे आदीं जण उपस्थित होते. या मोर्चाची सुरवात अजंठा चौकातून करत मोर्चा पालिका कार्यालयावर पोचला त्यावेळी मोर्चाला सामोरे जाण्यासाठी पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे उपस्थित नसल्याने आंदोलक संतप्त झाले.

यावेळी आंदोलकांनी रिकामा हंडा मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर आणि घागरीचे खापर मुख्याधिकार्‍यांच्या टेबलवर ठेवत निषेध नोंदवला. यावेळी बोलताना सुभाष घोडके यांनी म्हटले की, शेवगाव पाथर्डी पाणी योजनेची मुदत संपून 20 वर्षे झाले असून योजनेबाबत सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. आज पाणी टंचाईसाठी लोकसंख्या वाढीचे कारण नगरपालिकेकडून दिले जात पण नागरिकांकडून वसूल करत असलेल्या पाणीपट्टीप्रमाणे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नसून याकडे मुख्याध्यापिकारी आणि संबधीत अधिकारी दुर्लक्ष करत आहेत तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष झोपलेले आहेत.पाथर्डी तालुक्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची परंपरा असून येणार्‍या काळात वांबोरी आणि मुळाचे पाणी आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत. पालिका प्रशासनाकडून शहरातील पाणीप्रश्‍नांवर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर यापेक्षा भव्य मोर्चा आणण्यात येईल असा इशारा  शेवटी त्यांनी बोलताना दिला. तर यावेळी दिनकरराव पालवे यांनी बोलताना म्हटले की, शहराला त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा.पाणी नसल्याची अडचण आम्हाला मान्य नसून पालिका प्रशासनाकडून पाणीवाटप योग्यरीतीने होत नाही. टक्केवारीच्या वादात नाईक चौकातून पालिकेकडे येणार्‍या रस्त्याचे काम बंद पडले असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पाणीपुरवठा अभियंता सचिन राजभोज यांनी लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येऊन याबाबत प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात सोमवारी बैठक घेणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.

मुख्याधिकार्‍यांवर मोर्चेकर्‍यांचे गंभीर आरोप – उपस्थितांनी मोर्चेकर्‍यांनी मुख्याधिकारी हे आजपर्यंत कोणत्याच आंदोलनाला सामोरे गेले नसून नेहमीच पलायन करत असून ते मग्रूरपणे आपला कारभार करत असून ते फक्त कमिशनचे काम करण्यासाठीच पालिकेत येत असल्याचा गंभीर  आरोप केला.

COMMENTS