Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील बेकायदेशीर पबवर हातोडा

जिल्हा प्रशासनाने दोन पब बंद करत केली कारवाई

पुणे ः पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आणि प्रशासनाला कारवाईचे निर

प्राध्यापक प्रतिभारत्न राष्ट्रीय पुरस्काराने प्रो. डॉ. सविता मेनकुदळे सन्मानीत
Indapur : बावडा मारूती मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य
देहूत संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त लाखो भाविक दाखल

पुणे ः पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आणि प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी पबवरील मॅनेजरच्या मुसक्या आवळल्यानंतर बुधवारी पुणे महापालिकेने या पबवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत हातोडा उगारला आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बुलडोजर आणि जेसीपीच्या साह्याने अतिक्रमण विभागाने पबचे बांधकाम पाडले आहे.
कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाई करण्यात आली आहे. थेट बुलडोझर आणि जेसीपीने हे बांधकाम पाडले जात आहे. पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणानंतर पुण्यातील अवैध पब संदर्भातील विषय ऐरणीवर आला आहे. त्यानंतर दोन पब बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुण्यातील अपघातानंतर पुण्यात बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला आता सुरूवात झाली आहे. कोरेगाव पार्क येथे अवैधरीत्या निर्माण करण्यात आलेल्या पब वर ही तोडकामाला सुरूवात झाली आहे. या प्रकरणानंतर या अवैध पबवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. कार अपघातानंतर पुणे शहरातील दोन पब बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवस यांनी अल्पवयीन मुलांना दारू पुरवण्यासाठी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरियट स्वीट-ब्लॅक तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणार्‍या अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह दोन जणांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरातील एका लॉजमधून अटक केली. आलिशान पोर्शे कारचे जीपीएस ट्रॅक करत पुणे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला होता. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या साहाय्याने पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांचे पथक शहरात दाखल झाल्यावर आरोपींना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.  

विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलिस कोठडी – पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचे वडील तथा सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह नितेश शेवानी व जयेश गावकरे या 2 अन्य आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र तत्पूर्वी विशाल अग्रवाल याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पुण्यातील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने त्याच्या अंगावर काळी शाही फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम् संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा जेवढा जबाबदार आहेत, त्याचे वडील देखील तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केले आहे.

COMMENTS