उद्योजकांनी विषयी आपल्या भारतात सामाजिक जीवनात फारसं बोललं जात नाही. याचं विशेष कारण की उद्योजक आणि समाज यांच्यामध्ये वर्गीय कारणास्तव फार मोठे अंतर
उद्योजकांनी विषयी आपल्या भारतात सामाजिक जीवनात फारसं बोललं जात नाही. याचं विशेष कारण की उद्योजक आणि समाज यांच्यामध्ये वर्गीय कारणास्तव फार मोठे अंतर अर्थात दुरावा राहिलेला आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात त्या देशांच्या उद्योजकांचा निश्चित पणे हातभार असतो. परंतु जर उद्योजकाची भूमिका ही समाजाला विश्वासात घेणारी नसेल तर तो उद्योजक समाजात श्री कार्य होत नाही आणि लोकप्रिय देखील होत नाही. परंतु, भारतात सभ्य आणि समाजोपयोगी किंवा समाजाच्या हिताशी जोडून घेणारे काही उद्योग क्षेत्रातील नावे जर आपण घेतली तर त्यात राहुल बजाज यांचं नाव निश्चितपणे वरच्या स्थानी असेल. बजाज या कुटुंबाने आज पासून 96 वर्षापूर्वी स्थापन केलेला उद्योग राहुल बजाज यांनी फोर्ब्सच्या यादीत देशात श्रीमंतीच्या क्षेत्रात वरच्या काही नावांमध्ये स्थान मिळवण्यात इतपत पुढे नेली. बजाज स्कूटर हे त्यांचे उत्पादन दुचाकी वाहनात भारतात सर्वाधिक लोकप्रिय वाहन म्हणून गणले जाते. बजाजच्या या दुचाकीने भारतात दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत अक्षरशः कब्जा केलेला होता इतकी, लोकप्रियता स्कूटरने मिळवली होती. मात्र केवळ उद्योग हा पैशांसाठी करणं किंवा श्रीमंतांच्या यादीत अव्वल येण्यासाठी करणं असा राहुल बजाज यांचा उद्देश निश्चितपणे नव्हता. त्यांचे माने होते ती कोणत्याही उद्योजकतेची यशस्विता ही त्याच्या बॅलन्स शीट मधील आकडेवारीशी ताडून पाहणे हे योग्य निर्देशक नाही; तर लोकांच्या जीवनात आर्थिक विकास पाहणी हा उद्योजकतेचा दृष्टीकोण असावा आणि यावरच उद्योगाची यशस्विता तपासली गेली पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. या त्यांच्या भूमिकेला अनुसरून बजाज उद्योगाने आपला सामाजिक कृतज्ञता निधी हा लोकांच्या आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि महिला सक्षमीकरण सारख्या क्षेत्रांमध्ये खर्च करण्याचा उपक्रमही हाती घेतला. यातूनच त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या उद्योगातील सी एस आर फंड खर्च करण्याचा उपक्रमही राबवला. खरेतर भारतात आर्थिक प्रगती सामाजिक बांधिलकी आणि शासन संस्थेची सहकार्य अश्या कुत्र्यांचे पालन करणारा उद्योजक हा खरंतर सभ्य आणि सामाजिक उपयोगिता असणारच उद्योजक असतो. ही वैशिष्ट्ये राहुल बजाज यांच्यामध्ये निश्चितपणे होती. राहुल बजाज यांचा उद्योग हा खरे तर लायसन्स राज असणाऱ्या काळात उभा राहिला. या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी उद्योगाच्या नीतिमूल्यांची बांधील राहून शासन संस्थेशी सहकार्य करून आणि आपणही समाजाच्या प्रति काही ऋणानुबंध ठेवून असायला हवं अशा वैचारिक मूल्यांशी त्यांची बांधीलकी राहिली. अलीकडच्या काळात राजकीय सत्ता आपल्या हितसंबंधांसाठी निवडून आणण्याकरिता मुबलक निधी देणाऱ्या उद्योगपतींशी तुलना करता राहुल बजाज हे सभ्य आणि नीतिमूल्य यांचे बंधन पाळणारे उद्योजक म्हणूनच स्मरणात राहतील. सरकारच्या माध्यमातून जमिनी आणि सरकारी कंपन्या आपल्या मालकीच्या करण्याच्या नैतिक उद्योगांमध्ये राहुल बजाज यांना कधीही रस नव्हता. भारतात सभ्य आणि नीतिमूल्य पाळणाऱ्या उद्योजकांची जर नावे घेतली गेली तर त्यात राहुल बजाज यांचे नाव अग्रणी राहील याबाबत शंका नाही. कोणताही भांडवलदार हा नफा हा हेतू ठेवूनच उद्योग करीत असला तरी आपण कमावलेला नफा ज्या समाजातून व्यवसाय करून आपण मिळवला आहे त्यांच्या हितासाठी देखील त्यातून खर्च करायला हवा अशी बांधिलकी मानणारे राहुल बजाज हे उद्योग क्षेत्रात केवळ पैसा कमवणे किंवा नफा कमवणे एवढाच दृष्टीकोण बाळगून नव्हते. खरेतर उद्योजक हे त्याच व्यक्तीला म्हटले गेले पाहिजे ज्या व्यक्तीकडे आपल्या देशातील लोकांच्या उपयोगी ते साठी वस्तूंचे उत्पादन करण्याची कल्पकता असेल. भारतीय समाज हा मध्यम वर्ग म्हणून उदयाला येत असताना आणि आपल्या निवासस्थानापासून औद्योगिक किंवा नोकरीच्या ठिकाणी जाण्या पर्यंतचा प्रवास सहज व्हावा यासाठी श्रम मुक्त असं साधन प्रवासाकरिता निर्माण होण्याची गरज होती. ती गरज राहुल बजाज यांच्यातील कल्पक उद्योजकाने नेमकी हेरली आणि चेतक, प्रिया या स्कूटर ची निर्मिती झाली. सेक्सी या स्कूटरला सुरु करताना थोडाही अडथळा निर्माण झाला तर थोडीशी तिरपी केली ती गाडी सुरू व्हायची हे जे दृश्य भारतीय जनमानसात रुजला सहजता म्हणून किंवा यंत्रातील कोणताही अडथळा सहजपणे दूर करता येतो याची निर्देशक बनले. राहुल बजाज यांच्या पूर्वापार कुटुंबाचा काँग्रेस या राजकीय पक्ष अशीच संबंध असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते संबंध असल्यामुळे त्यांनी या संबंधांपासून आपल्याला वेगळे केले नाही. त्यामुळे राज्यसभेवर त्यांना खासदार म्हणून देखील पाठवण्यात आले. असे असले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या एका नेत्याविषयी बोलताना म्हटले होते की, ” देशाला न मिळू शकलेले एक होतकरू पंतप्रधान” , असे वर्णन केले होते. त्यांनी हे वर्णन त्यांनी त्याविषयी केले ते नेते काँग्रेसचे नाहीत तरीही आपला एक दृष्टिकोन ज्याला निकोप म्हणता येईल त्याविषयी बोलताना त्यांनी कधीही संकोच केला नाही. जागतिकीकरणाच्या काळानंतर जगातील सर्व भांडवलदार उद्योजक एक आक्रमक धोरण घेऊन त्या त्या देशांच्या सार्वजनिक साधनसंपत्तीवर कब्जा करण्यासाठी स्पर्धा करीत असताना, राहुल बजाज यापासून अलिप्त राहिले किंवा आपल्या उद्योजकतेला इतके ओंगळवाणी रूप त्यांनी कधीही येऊ दिले नाही हे त्यांचे मोठेपण मान्य करायला हवे!
COMMENTS