Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हळदी – कुंकू कार्यक्रमात महिलांना ‘कुंदा’ रोपांची भेट

अकोले : सण, संस्कृती आणि सामाजिक भान यांची सुंदर सांगड घालत पर्यावरण संवर्धनाचा जिव्हाळ्याचा संदेश देणारा एक स्तुत्य उपक्रम अकोल्यात वरद विनायक रो हाऊ

शेरणखेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर
एसबीआयकडून  मृत खातेदारास 2 लाखांची मदत
शिस्तीसह हवे वेळेचेही व्यवस्थापन : शेलार

अकोले : सण, संस्कृती आणि सामाजिक भान यांची सुंदर सांगड घालत पर्यावरण संवर्धनाचा जिव्हाळ्याचा संदेश देणारा एक स्तुत्य उपक्रम अकोल्यात वरद विनायक रो हाऊसिंग सोसायटी येथे उत्साहात पार पडला.

सोसायटीतील महिलांनी आयोजित केलेल्या हळदी- कुंकू कार्यक्रमात पारंपरिक भेटवस्तूंऐवजी महिलांना स्थानिक देशी प्रजातीतील, कुंदा झाडांची रोपे भेट देण्यात आली. त्यामुळे सणाचा आनंद आणि निसर्गप्रेम यांचा दुहेरी संगम अनुभवायला मिळाला.

या अभिनव उपक्रमामागे माधवी योगेश नवले, गीता संजय दिघे आणि रंजना विनोद खतेले यांची पर्यावरणपूरक संकल्पना होती. हळदी- कुंकवाच्या मंगल वातावरणातून देशी प्रजातींचे संवर्धन व्हावे, कृत्रिम वस्तूंपेक्षा निसर्गदायी पर्याय स्वीकारण्याची सवय वाढावी आणि पांढऱ्या फुलांमधून शांती, पवित्रता व त्याग यांसारख्या सकारात्मक मूल्यांचा संदेश समाजात पोहोचावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणिवेची जोड देणारा हा प्रयत्न इतर संस्थांसाठीही आदर्श ठरू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास सोसायटीतील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. माधवी नवले म्हणाल्या, प्रत्येक दारासमोर मन प्रसन्न करणाऱ्या स्थानिक देशी प्रजातीच्या फुलझाडांचे रोप लावले गेले, तर परिसराचा चेहरामोहराच बदलेल, या विचारातून हा छोटासा प्रयत्न करण्यात आले. महिलांच्या सहभागातून देशी प्रजातींच्या वृक्ष संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS