Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीनगरमध्ये उत्साहपूर्ण हळदी-कुंकू सोहळा

महिलांसाठी संगीत खुर्चीची मजा, विजेत्यांना ‘पैठणी’चा सन्मानकेज । प्रतिनिधीकेज शहरातील क्रांतीनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मकर संक्रांती

श्रीक्षेत्र दत्त मंदिराला जाण्यासाठी पायर्‍यांचे बांधकाम पूर्ण; 9 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखा; शिवसेनेचा नगरपालिकेवर आंदोलनाचा इशारा
गुजर समाज निवडणुकीसाठी एकवटला

महिलांसाठी संगीत खुर्चीची मजा, विजेत्यांना ‘पैठणी’चा सन्मान
केज । प्रतिनिधी
केज शहरातील क्रांतीनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या शितलताई लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
समारंभात उपस्थित महिला भगिनींसाठी आयोजित ‘संगीत खुर्ची’ स्पर्धा मुख्य आकर्षण ठरली. परिसरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना शितलताई लांडगे यांच्या हस्ते पैठणी साडी देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांनी गाणी आणि खेळ यांच्या माध्यमातून आनंद साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शितलताई लांडगे यांनी भूषवले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक शिंनगारे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याशिवाय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घोरपडे सर, सुतार मॅडम आणि हजारे सर यांनी परिश्रम घेतले. क्रांतीनगर भागातील पालक, महिला भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी मान्यवरांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि सामाजिक स्नेह जपला जातो.

COMMENTS