Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील गुटखा तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डकडे ?

मुंबईः मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गेल्या आठड्यात डोंगरी परिसरात कारवाई करून गुटखा तस्करीशी संबंधित टोळीला अटक केली असून या तस्करीचे धागेदो

राज्यात पावसाचे थैमान सुरूच
चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळे 53 गावातील 1300 हेक्टरवर एकवीशे शेतकऱ्यांचे नुकसान
मुनव्वर फारुकीचे ब्रेकअप

मुंबईः मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गेल्या आठड्यात डोंगरी परिसरात कारवाई करून गुटखा तस्करीशी संबंधित टोळीला अटक केली असून या तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी जुळल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुरुवारी डोंगरी येथील उमरखाडी आणि डोंगरी परिसरातील न्यू बंगालीपुरा येथील सदनिकांवर छापा टाकून बंदी असलेला गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा 30 हजार 300 रुपये किंमतीचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी अबू सलीम खान, फहीम खान, अबुलश शेख, शारिक अझीम खान, मोहम्मद उमर खान, मोहम्मद फरहान अब्दुल बटाटेवाला आणि अझीम इस्माईल खान या सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी डोंगरी परिसरातील आणखी पाच ते सहा गोदामांवर छापे मारले, तेथून सुमारे 45 लाख रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखू जप्त करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून यांत सक्रिय असून सरकारने गुटख्यावर बंदी घातल्यामुळे त्याच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आता गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून गुटखा आणत असल्याचे या गोदामांचे मालक अबू सलीम खान आणि अझीम इस्माईल खान यांनी चौकशीदरम्यान सांगितले. आसिफ माझगाव, सनी ठाकूर, वकार भिवंडीवाला हे घाऊक दराने गुटख्याचा पुरवठा करीत होते. ते उमरखाडी जवळच्या गोदामात आणि डोंगरी येथील ट्रान्झिट कॅम्प रूबी इमारतीमध्ये गुटख्याचा साठा करीत होते. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 328,273, 199 तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी केवळ मोहरे असून त्यांच्या आडून परदेशातील हस्तक तस्करीत सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.

COMMENTS