गुटका साठा प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुटका साठा प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : अन्न-औषध विभागाने पकडलेल्या गुटका साठा प्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगरच्या अन्न व औषध विभागाने सहा डिसेंबर

धक्कादायक, अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यु | LOKNews24
पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या.
भूसंपादनाचे पैसे गायब…मनपा बजेट चर्चाही स्थगित

अहमदनगर/प्रतिनिधी : अन्न-औषध विभागाने पकडलेल्या गुटका साठा प्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगरच्या अन्न व औषध विभागाने सहा डिसेंबर रोजी बोल्हेगाव परिसरात एका संशयित टेम्पोमधून गोवा ब्रँडच्या गुटक्याचा मोठा साठा पकडला होता. या प्रकरणी अज्ञात आरोपींची ओळख आणि जप्त प्रतिबंधित गुटक्याचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषधचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात बोल्हेगाव परिसरातील कारवाई प्रकरणी बाळू बागाजी साठे (रा. निंबळक गावठाण, ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यास घातक असलेला आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची साठवण, वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर सहभागी आरोपींचा शोध सुरू आहे. यात गुटका निर्मिती करणारे, खरेदीदार, विक्रेते, वाहतूक करणारे यांचा शोध घ्यायचा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.6 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून नमुना सहायक प्रसाद कसबेकर, पंच गणेश ठाणगे यांच्यासह बोल्हेगाव परिसरात रात्री गेले असता आदेश लॉनजवळ असलेल्या प्राईम बंगल्याशेजारी मोकळ्या जागेत एक टेम्पो संशयास्पद उभा असल्याचे दिसून आले. टेम्पो जवळ जाताच तिथे असलेला एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत गोवा ब्रँड गुटक्याच्या अनेक पांढर्‍या गोण्या आढळून आल्या. हा सर्व मुद्देमाल पंचनाम्यासाठी अन्न-औषध विभागाच्या कार्यालयात आणण्यात आला. त्यातील 11 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच टेम्पोत सापडलेल्या वाहनाच्या कागदपत्रांवरून हा टेम्पो बाळू बागाजी साठे (रा. निंबळक गावठाण) याचा असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून साठे याला लेखी पत्राद्वारे खुलासा मागितला असता अद्याप तो संबंधिताने दिलेला नाही तसेच जप्त गुटक्याचे नमुने अन्न विश्‍लेषकांच्या जन आरोग्य प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचे अहवाल आल्यानंतर शासनाने निर्मिती, वाहतूक, विक्रीस प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची साठवणूक आणि वाहतूक केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS