Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरुजी शाळा भरवा , नाहीतर आम्ही भरवतो

पढेगाव ग्रामस्थांचा एल्गार

कोपरगाव प्रतिनिधी -सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप सुरु आहे.त्या संपात शिक्षकही सहभागी असल्यामुळे आता शाळाही बंद आह

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घेतले शनिदर्शन
राहुरीत पोलिस पाटील, मंगल कार्यालय मालकांची बैठक उत्साहात
राहुरीत खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी -सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप सुरु आहे.त्या संपात शिक्षकही सहभागी असल्यामुळे आता शाळाही बंद आहे.मात्र त्यासाठी विद्यार्थी   शिक्षणापासुन वंचित रहात  असल्यामुळे तालुक्यातील पढेगावच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सोशल मिडीयावर शनिवारी सकाळी शाळा पदवीधरांनी पुढे यावे शाळा भरवायची आहे आशा आशयाचा मजकूर व्हायरल केला.त्याप्रमाणे शनिवारी सकाळी आठ वाजता पालक,विद्यार्थी,ग्रामस्थांनी शाळेच्या गेटवर गर्दी करुन तातडीची ग्रामसभा घेऊन त्यात गुरुजी शाळा भरवा नाहीतर आम्ही भरवतोचा नारा पुकारण्यात आला.

       जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे यांना फोन करुन बोलवण्यात आले.परंतु त्यांना उशिर होत असल्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने ग्रामसेवक,तलाठी,कोतवाल,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात केली.तदनंतर मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे,उपशिक्षक महानुभाव,बाराते,हांडे उपस्थित झाले.चर्चेअंती सोळसेंनी सहशिक्षकांशी चर्चा करुन धरणे आंदोलनानंतर जो वेळ मिळेल त्या काळात शाळा भरविण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला.तसेच शाळेचा आपण अट्टाहास धरता तशे धोरण तलाठी ग्रामसेवकांसाठी राबवणार का?असा प्रतिप्रश्नही मुख्याध्यापकांनी उपस्थितांना केला.

         संप काळात परिक्षा सुरळीत चालु आहे.मग शाळा सुरु ठेवण्यास काय अडचण आहे. तुमच्या मागणीसाठी गरीबांच्या मुलांचे शालेय नुकसान करता येणार नाही.शाळा सुरु होणार नसतील तर गावातील पदवीधर शाळा सुरु ठेवतील तरी सोमवारपर्यंत निर्णय द्या असा निर्वाणीचा इशारा देऊन आमदार खासदारांची पेन्शन बंद करण्याचा आणि शेतकऱ्यांनाही जुनी पेन्शन सुरु करण्याचे ठराव यावेळी मांडण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS