Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीर्थक्षेत्र मोहनपुर येथे गुरुपोर्णिमा उत्सव

नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहनपुर वाहेगाव येथे सोमवार, दि. 3 जुलै रोजी

अ‍ॅपद्वारे अमली पदार्थाची विक्री करणारा अटकेत
कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)
लाल परीच्या टायरने मध्यरात्री घेतला अचानक पेट

नांदेड प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहनपुर वाहेगाव येथे सोमवार, दि. 3 जुलै रोजी श्री महंत 1008 रामभारती गुरु मारोती भारती यांच्या प्रेरणेने पारंपरिक गुरुपोर्णिमा उत्सव व अखंड दत्तनाम चातुर्मास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी मा. श्री अभिजीत राऊत यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता अन्नछत्र या कायमस्वरूपी उपक्रमाचे उद्धघाटन करण्यात येणार असून कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य आमदार राम पाटिल रातोळीकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, कुंटूर शुगर प्रा. लि. चे संचालक राजेश कुंटूरकर, नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संजय वारकड, वाघलवाडा कारखान्याचे चेयरमैन श्री मारोती कवडे गुरूजी, पोलीस निरीक्षक विजय धोंडगे, तहसीलदार व्यंकटेश मुंढे, माजी नगराध्यक्ष श्री चंद्रकांत पाटिल, मा. रुद्रावा मैडम, श्री राजकुमार मुक्कावार, श्री दशरथ चौधरी, श्री अमित बियाणी, श्री फौजी महाराज, श्री हरमीतसिंघ बिंद्रा, श्री रविंद्रसिंघ मोदी पत्रकार, श्री कृष्णा उमरीकर पत्रकार, श्री माणिक मोरे पत्रकार, श्री सुनील कौठेकर यांची मुख्य उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात विविध धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मंडळी उपस्थित राहणार आहे. वरील कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री महंत 1008 रामभारती गुरु मारोती भारती यांनी केले आहे.

COMMENTS