Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनायक प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

बीड प्रतिनिधी - विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर,प्रमुख प

न्यूझीलंडचे ग्रँट ब्रॅडमन पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक
समाजकल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयांसाठी आज सातार्‍यात मेळावा
उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार…

बीड प्रतिनिधी – विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर,प्रमुख पाहुणे भारतीताई क्षीरसागर,शिवलिंग क्षीरसागर,उत्तरेश्वर भारती सर,अजिंक्य चांदणे सर,यांनी शिक्षणाची देवता सरस्वती,शाळेच्या प्रेरणास्थान गुरुतुल्य,वंदनीय स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरुपौर्णिमेचे महत्व व उद्देश, संकल्पना, भूमिका शाळेचे श्री.बाळू काळे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून विषद केली.शाळेतील मुलां-मुलींनी आपल्या गुरुवर्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता भाव व्यक्त केला. विविध मुलांनी आपल्या शिक्षकांविषयी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.लहान लहान मुले खुप उत्साहाने बोलत होती.याप्रसंगी शाळेचे अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सर, दिलीप तकीक सर, शैला बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम, मनीषा चौधरी मॅडम,सिमा उदगीरकर मॅडम,वर्षा म्हेत्रे मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम,रिता वाघमारे मॅडम यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधित केले. गुरू ज्ञानाचा सागर आहे गुरू विश्वाचा आधार आहे .गुरुविन जीवन प्रगती करू शकत नाही,माझ्या आधार गुरुतुल्य स्व.काकूंच्या प्रेरणेन,माझ्या गुरुजनांमुळे मी घडले व पुढे आले आहे.विद्यार्थी घडवणारा खरा शिक्षक खुप महत्वाचा असतो,गुरूंनी दिलेली ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभराची असते ती संपत नसते, गुरू,शिक्षक हे जीवनाचे शिल्पकार असतात त्यांचा आदर, सन्मान विनम्रता ठेवणे शिष्यांचे,विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते.सर्व गुरुवर्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,गुरूंनी शिकवलेल्या संस्काराची, ज्ञानाची आपण जपणूक करून ती पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हे गरजेचे आहे ,अशा महत्वपूर्ण भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या.या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.विवेक गव्हाणे सरांनी केले तर आभार संजीवनी पवळ मॅडम यांनी मानले.

COMMENTS