मुंबई ः सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांना गुरूवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सदावर्ते यांची वकिलीची सनद निलंबि

मुंबई ः सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांना गुरूवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सदावर्ते यांची वकिलीची सनद निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणी आता बार कौन्सिलने सदावर्तेंना दिलासा दिला असून निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने करुन वादाला तोंड फोडले होते. वकिली व्यवसायाचा पांढरा बँड परिधान करुन त्यांनी विधान केल्याने एक प्रकारे आचारसंहितेचा भंग केला होता. शिवाय त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झालेला होता. या प्रकरणी त्यांची सनद निलंबित करण्यात आलेली होती. आता त्यांना याच प्रकरणात दिलासा मिळाला आहे. गुरुवारी गुणरत्न सदावर्ते यांची सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला बार काऊन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना दिलासा मिळाला आहे.
COMMENTS