Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुळवे हे माणुसकीचे असल्यामुळेच सर्वाधिक उसाचे गाळप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदेव राऊत यांचे प्रत्युत्तर

कर्जत/प्रतिनिधी  ःकर्जत- जामखेडमधील शेतकर्‍यांच्या सर्व उसाचे गाळप करण्याचे काम बारामती ग्रोने केलेले आहे. सरकारने बारामती ग्रोच्या संचालक मंडळाव

शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान
बँकेतून ४५ हजार रुपये काढले व चोरट्याने लगेच लंपास केले | ‘माझं गाव माझी बातमी’ | LokNews24
वाहतूक नियंत्रणासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर

कर्जत/प्रतिनिधी  ःकर्जत- जामखेडमधील शेतकर्‍यांच्या सर्व उसाचे गाळप करण्याचे काम बारामती ग्रोने केलेले आहे. सरकारने बारामती ग्रोच्या संचालक मंडळावर दाखल केलेला गुन्हा हा कारखान्याच्या संचालकावर मंडळावर नसून कर्जत- जामखेडमधील शेतकर्‍यांवर दाखल झालेला गुन्हा आहे. कर्जत- जामखेड तालुक्यातील कोणत्याही गावातील शेतकर्‍याचा ऊस तोडताना तो शेतकरी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय किंवा इतर कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले जात नाही. तो शेतकरी कर्जत- जामखेड मधला आहे आणि त्या कर्जत- जामखेडचे नेतृत्व आ. रोहित पवार हे करत आहेत, आणि ते सर्वसमावेशकपणे करत आहेत. म्हणूनच सर्व शेतकर्‍यांचा ऊस तोडून शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम आ. रोहित पवार व बारामती ग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे करत आहेत. सुभाषआबा गुळवे यांची मानसिकता चांगली असल्यामुळेच सर्व शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप झाले आणि शेतकर्‍यांचा एक टिपरू सुद्धा ऊस राहणार नाही याची काळजी बारामती ग्रो आणि गुळवे हे घेत असतात, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते तथा प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिले आहे.
राऊत यांनी पुढे म्हटले आहे, कर्जत- जामखेडमध्ये उसाच्या क्षेत्राची लागवड भरपूर प्रमाणात झालेली आहे. बारामती ग्रो साखर कारखान्याच्या विश्‍वासावरच शेतकर्‍यांनी उसाची लागवड केलेली आहे. सुभाष गुळवे यांनी जी मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्यांनी अनेक वेळा माजी मंत्री राम शिंदे यांच्याबद्दल आदराने उल्लेख केलेला दिसत आहे. मात्र राजकीय मुलाखत म्हटले की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. महाराष्ट्रामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय नेतृत्व अतिशय सामान्य कुटुंबातून घडलेले आहेत ही ज्याच्या त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेचा भाग आहे. गुळवेआबा हे इलेक्ट्रिक फिटरचे काम करत होते. त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, म्हणूनच ते आज एवढ्या मोठ्या बारामती ग्रो तसेच करमाळा तालुक्यातील एक दिग्गज आणि जाणकार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सामान्य कुटुंबातून तर कर्जीं- जामखेडमध्ये कितीतरी जण मोठ्या पदावर गेलेले आहेत. जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, त्याला मित्रपरिवाराची, पक्षाची नात्यागोत्याची साथ मिळत असते. त्याच्यामुळे गुळवेआबा हे काय करीत होते, हे पाहण्यापेक्षा सध्या ते बारामती ग्रोच्या माध्यमातून आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. गुळवे हे कर्जत- जामखेडमधले नसले तरी बारामती ग्रोचे कार्यक्षेत्र हे कर्जत- जामखेड आहे. त्यामुळे कर्जत- जामखेडच्या राजकारणामध्ये आबांनी बोलणे हे काही वावगे नाही. राऊत यांनी पुढे म्हटले आहे, बारामती ग्रोवर गुन्हा दाखल करून बारामती ग्रोचा माज उतरवला असे वर्तमानपत्रात म्हटले आहे. परंतु सत्य परिस्थिती म्हणजे शेतकर्‍यांना न्याय देणार्‍या कारखान्याची अडवणूक करणे असा त्याचा अर्थ होतो. रास्ता रोको आंदोलनामध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असतात. या विषयाचे भांडवल करण्याची आवश्यकता नाही. खासदार शरद पवार साहेब काय व्यवसाय करत होते, विरोधी पक्ष नेते अजितदादा हे काय काम करत होते आणि त्यांच्याकडे सध्या काय आहे, हे बोलताना एक बोट पवार कुटुंबाकडे दाखवले तर त्याच्यामधील चार बोटे ही आपल्याकडे असतात. त्यामुळे त्यावर न बोललेले योग्य राहील, असे राऊत यांनी शेवटी म्हटले आहे.

COMMENTS