Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुजर समाज निवडणुकीसाठी एकवटला

शिरूर-पाटोद्यात प्रत्येकी एक जागा लढवण्याचा ठाम निर्णय बीड । प्रतिनिधी शिरूर व पाटोदा तालुक्यातील गुजर समाजाची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार

बीड : मुख्य पाईपलाईनसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !
रयत सामाजिक प्रतिष्ठानचा 16वा पुरस्कार वितरण सोहळा 2026 थाटात संपन्न
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा कालावधीत कलम 163 प्रमाणे मनाई आदेश

शिरूर-पाटोद्यात प्रत्येकी एक जागा लढवण्याचा ठाम निर्णय
बीड । प्रतिनिधी
शिरूर व पाटोदा तालुक्यातील गुजर समाजाची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना गुजर समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आगामी पंचायत समिती निवडणूक, समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासह विविध सामाजिक व राजकीय विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत अनेक इच्छुक उमेदवारांनी पंचायत समिती निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली. चर्चेनंतर शिरूर तालुक्यातून एक व पाटोदा तालुक्यातून एक अशा प्रत्येकी एका जागेवर गुजर समाजाचा उमेदवार उभा करण्याचा ठाम निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. जो राजकीय पक्ष गुजर समाजाला योग्य प्राधान्य देईल, त्या पक्षाच्या पाठीशी संघटितपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच, कोणत्याही पक्षाने योग्य प्रतिनिधित्व न दिल्यास अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. शिरूर तालुक्यातील अनेक समाजबांधवांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून, एकच उमेदवार निश्चित करून त्याच्या पाठीशी संपूर्ण समाजाने एकसंघपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजर समाज हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशभर पसरलेला आहे. अखिल भारतीय देवनारायण सेनेचे सर्व पदाधिकारी आपल्या पाठीशी ताकदीने उभे राहणार आहेत. कार्यकारी अध्यक्ष भीमसिंह गुजर, प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी गुजर पाटील (नाशिक) तसेच राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण टीम तन-मन-धनाने सहकार्य करणार आहे. समाजाची भक्कम ताकद उभी करून एक-एक कार्यकर्ता निवडून आणण्यासाठी आता सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे, असे त्यांनी आवाहन केले. या बैठकीला माजी सरपंच डोंगर पाटील, जाटनांदूरचे सरपंच सचिन माने, पंचायत समिती सदस्य संजय डोंगर, तालुका अध्यक्ष शहादेव डोंगर, माजी सरपंच हनुमान डोंगर, ज्येष्ठ समाजसेवक गणीभाई शेख, ज्येष्ठ शिवसैनिक खदीर पेंटर, चेअरमन सोमीनाथ डोंगर, साहेबराव डोंगर यांच्यासह विविध स्तरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी गुजर समाजाने आगामी पंचायत समिती निवडणुकीत संघटितपणे सहभाग घेऊन समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS