Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी कृषी विद्यापीठाकडून तेल्या रोगाबाबत मार्गदर्शन

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी निंबवडे (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे डाळिंब पिकावरील तेल्या रोगाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेल्या क्षेत्रांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाने तयार केलेली डाळिंब तेल्या रोगावरील सविस्तर मार्गदर्शन पुस्तिका ऑनलाईन ई-मेल व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी रविंद्र गुटकुडे यांना यापूर्वीच पाठविण्यात आली होती. त्यानंतर सदर मार्गदर्शक पुस्तिकांचे वितरण निंबवडे ग्रामपंचायत कार्यालयात तसेच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आले. या प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांना डाळिंब तेल्या रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, योग्य कीड-रोग नियंत्रण पद्धती तसेच शाश्वत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठामार्फत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर व अचूक नियंत्रण करण्यास निश्चितच मदत होणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ.रविंद्र गायकवाड, प्रकल्प समन्वयक डॉ.संजय कोळसे, संशोधन सहयोगी डॉ.प्रवीण खैरे (हॉर्टसॅप प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विहिरीत नग्नावस्थेत आढळला मृतदेह 
रिक्षा-बसच्या अपघातात तिघे ठार 
राहुरीत गुन्हेगारी वाढली, पोलिसांची पकड सैलच !

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी निंबवडे (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे डाळिंब पिकावरील तेल्या रोगाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेल्या क्षेत्रांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाने तयार केलेली डाळिंब तेल्या रोगावरील सविस्तर मार्गदर्शन पुस्तिका ऑनलाईन ई-मेल व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी रविंद्र गुटकुडे यांना यापूर्वीच पाठविण्यात आली होती. त्यानंतर सदर मार्गदर्शक पुस्तिकांचे वितरण निंबवडे ग्रामपंचायत कार्यालयात तसेच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आले.

या प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांना डाळिंब तेल्या रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, योग्य कीड-रोग नियंत्रण पद्धती तसेच शाश्वत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठामार्फत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर व अचूक नियंत्रण करण्यास निश्चितच मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ.रविंद्र गायकवाड, प्रकल्प समन्वयक डॉ.संजय कोळसे, संशोधन सहयोगी डॉ.प्रवीण खैरे (हॉर्टसॅप प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS