Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी केली राम मंदिर परिसराची पाहणी  

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - काल रात्री दोन गटात किरण पुरा राम मंदिर येथे वाद झाले. त्या वादातून त्याठिकाणी दहा ते बारा गाड्यांची जाळपोळ करण्य

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ द्या ; आ.सतीश चव्हाण यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर मध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
औरंगाबादमध्ये अभियंता अडकला हनीट्रपमध्ये

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – काल रात्री दोन गटात किरण पुरा राम मंदिर येथे वाद झाले. त्या वादातून त्याठिकाणी दहा ते बारा गाड्यांची जाळपोळ करण्यात आली ही वार्ता पालकमंत्री यांना कळताच त्यांनी त्या परिसराची पाहणी केली. जे 

कोणी दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगितले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे तरी जनतेने शांतता ठेवावी आणि रामनवमी पार पाडावी रमजानचा महिना आहे आणि महावीर जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे हे सर्व सण शांततेत पार पाडावेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु आज आपण सर्वांनी शांतता पाळून शांततेत सणउत्सव पार पाडावेत. तरुणा तरुणांमध्ये दोन गटात झालेला वाद आहे त्यामुळे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी रात्रभर सर्व परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे आणि परिस्थिती शांत आहे, कोणीही यात राजकारण करता सर्वांनी शांततेत सण पार पाडावेत, असे भूमरे यावेळी म्हणाले

COMMENTS