Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालकमंत्री मा. ना.दादाजी भुसे यांनी सांधला मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद.

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने साकाराण्यात येणाऱ्या १२६ मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांश

 बिसलेरीचा ब्रँड टाटांच्या मालकीचा होणार  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरवर समाजकंटकांनी फेकले शेण
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना ब्लड कॅन्सर ?

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने साकाराण्यात येणाऱ्या १२६ मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, युनिसेफचे राज्य समन्वयक संदीप तेंडूलकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, नाशिक शहर पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, मॉडेल स्कूलमधील शिक्षक व विद्यार्थी हे उपस्थित होते.

मा. पालकमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकास योजनेच्या धर्तीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या १२६ शाळांचा आदर्श शाळांचा विकास होत आहे. मिशन मॉडेल स्कूल अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये असणाऱ्या सुविधा जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलमध्ये पुरविल्या जाणार आहे. ग्रामीण भागातील गरिब परंतु होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे. या मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण, कला, क्रीडा या विषयांचे शिक्षण विद्यर्थ्यांना मिळणार आहे. योगा, चिंतन, रोबोटिक्स, संगणक, बसायचे अद्यायवत बाक या आधुनिक साधनांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. असे प्रतिपादन केले. यापुढे ते म्हणाले की, या कामात शाळा व्यवस्थापन समित्या, गावचे सरपंच,  ग्रामपंचायत सदस्य, दानशूर व्यक्ती यांचा सहभाग घेवून या शाळांचा विकास हा जिल्हा परिषदेने करावा. मॉडेल स्कूल हा नाशिक जिल्ह्यातील उपक्रम भविष्यात महाराष्ट्र राज्यासाठी पथदर्शी ठरणार असून या कामात कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही असे यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी उन्हाळी सुट्यांमध्ये विद्यार्थांनी खेळासोबतच इंग्रजी शब्द समूहांचा संचय करावा या हेतूने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून स्पेलींग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी सुटीच्या दिवसांमध्ये करावायचे 5 उपक्रम सांगितले त्यामध्ये १) टाकाऊपासून टिकाऊ २) भारताचा बहुआयामी नकाशा तयार करणे ३) जगाच्या नकाशावर ३० देश दर्शविणे ४) इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यासाठी – बाजरी, नाचणी, ज्वारीची भाकरी बनविणे, गव्हाची चपाती बनविणे, ठेचा, आम्लेट, चटणी बनविणे, ५) ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी घरातील प्रौढ निरक्षर, आपल्या घराशेजारील प्रौढ निरक्षरांना साक्षर बनविणे, इत्यादी उपक्रम राबवण्याचे आव्हान दिले. जे विद्यार्थी  आव्हान स्वीकारून उत्कृष्ठ कामगिरी करतील त्यांना बक्षिसे दिले जातील असे सांगितले.

युनिसेफचे राज्य समन्वयक संदीप तेंडूलकर यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक शिकवले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल हे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले. नाशिक शहर पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी हे देखील सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असुन त्यांनी विद्यार्थ्यांना बालकांबाबत असलेल्या कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करतांना आईचे प्रेम व मातृभाषेतील शिक्षण यांच्यात समानता असल्याचे प्रतिपादन केले. आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे यांनी केले.

COMMENTS