Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्‍वरमध्ये 640 एकर जमीन हडपली

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप कारवाईची केली विधिमंडळात मागणी

मुंबई ः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर येथील झाडाणीमध्ये गुजरातच्या जीएसटी आयुक्त यांनी तब्बल 640 एकर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी

’मित्रा’साठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी
पक्ष फोडला आता कंत्राटी भरतीचे पाप करू नका
…तर, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार

मुंबई ः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर येथील झाडाणीमध्ये गुजरातच्या जीएसटी आयुक्त यांनी तब्बल 640 एकर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. तसेच याप्रकरणी राज्य सरकार काय कारवाई करणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. यावेळी वडेट्टीवार यांनी अँम्बुलन्स घोटाळ्याचाही आरोप करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. सोमवारचे विधानसभेचे कामकाज पावसामुळे स्थगित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पुन्हा एकदा कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यात मस्ती आणि दादागिरी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महाबळेश्‍वरजवळ झाडाणी नावाचे गाव आहे. तिथे गुजरातच्या जीएसटी आयुक्ताने 640 एकर जमीन अल्पदरात खरेदी केली. ही खरेदी करताना सर्व नियम मोडले गेले. कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन खरेदी करण्यात आली. नंतर खोदकाम करण्यात आले. डोंगरे पोखरून काढली.

यासाठी महसूल विभागाची परवानगी देखील घेतली नाही, असा गंभीर आरोप वडेट्टवार यांनी केला आहे. वडेट्टरवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही इतकी मनमानी कशी सुरू आहे? संबंधित गावातील लोकांनी तक्रारी केली. त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. आम्ही जेव्हा पत्र पाठवले तेव्हा महुसल विभागाने थातुर-मातुर उत्तर दिले. इथे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत. करोडो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. एवढी मस्ती आणि दादागिरी सुरू आहे. जमिनी खरेदी करून अवैध बांधकाम सुरू केले आहे. हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. मात्र वन्यप्राण्यांची कोणतीही पर्वा केली जात नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार म्हणाले की, संबंधित अधिकार्‍याला यासंदर्भात केवळ नोटीस पाठवण्यात आली. वनजमिनीतून काढलेल्या रस्त्यावरून वन कायद्याचे उल्लंघन झाले. कोणतेही परवानगी न घेता डोंगरातून रस्ते काढण्यात आले. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यावर सरकार काय कारवाई करणार आहे?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

कॉरीडॉर भूसंपादनात मोठा घोटाळा – राज्यात पायाभूत प्रकल्पासाठी जे भूसंपादन केले जात आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहेत. विरार, अलिबाग येथील भूसंपादन कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. वडेट्टीवार म्हणाले की, पनवेल प्रांत अधिकार्‍यांकडे विरार-अलिबाग कॉरीडॉरचे भूसंपादन सुरू आहे. वडवली, मोबै, आंबिवली, कुंडेवहाळ, चिंचवली अशा जवळपास 30 ते 35 गावात एजंटगिरी बोकाळली आहे. या ठिकाणी किती हेक्टर जमिनीचा मोबदला दिला हा खरा प्रश्‍न आहे. किती शेतकरी लाभार्थी भूसंपादनात आहेत, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.  

संपूर्ण गावच बळकावल्याची चर्चा – गुजरातमधील अहमदाबादच्या जीएसटी कमिशनरने संपन्न आणि अनेक दुर्मिळ वनस्पती-प्राण्यांचा अधिवास असलेले झाडाणी हे संपूर्ण गावच बळकावल्याची चर्चा आहे. सध्या गुजरातमध्ये कार्यरत असलेले आणि मूळचे नंदुरबारचे असलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी चंद्रकांत वळवी यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या भागातील तब्बल 620 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यानंतर हा प्रश्‍न विधानसभेत गाजतांना दिसून येत आहे.

COMMENTS