Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जी च्या निर्णायक गोलने कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत

पुणे / प्रतिनिधी : जी सो युन हिच्या लांबवरून मारलेल्या गोलमुळे कोरिया रिपब्लिक संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य

चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन
उर्वशी रौतेला -सुर्यकुमार यादव एकत्र
नीरज चोप्राने घेतला रौप्यपदकाचा वेध

पुणे / प्रतिनिधी : जी सो युन हिच्या लांबवरून मारलेल्या गोलमुळे कोरिया रिपब्लिक संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतउपविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 1-0 गोलने पराभव केला. हा सामना रविवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झाला.
सामन्याला दोन मिनिटे बाकी असताना चेल्सीची मध्यरक्षक जी युन हिने 25 यार्डावरून मारलेल्या अफलातून किकने कोरिया रिपब्लिकचा विजय साकार केला. विशेष म्हणजे त्यापूर्वी कोरिया रिपब्लिकच्या चो सो ह्यून हिला पेनल्टी साधण्यात अपयश आले होते. कोरियाची गाठ आता आज रात्री होणार्‍या चायनीज तैपेई आणि फिलिपिन्स यांच्यातील विजेत्याशी पडणार आहे.
जी हिच्या गोलमुळे तिची क्लब सहकारी सॅम केर हिचा खेळ झाकोळला गेला. आज सॅमला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. सामन्याच्या सातव्या मिनिटाला केर हिला गोल करण्याची संधी चालून आली होती. लांबवरून आलेला पास छातीवर घेत तिने चेंडू क्लिअर करून जोरदार किक मारली. मात्र, ती गोलपोस्टच्या वरून बाहेर गेली. त्यानंतर 12 मिनिटांनी ऑस्ट्रेलियाला गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली होती. या वेळी देखिल केर हिलाच गोल करण्याची संधी होती. पण, तिचा हा प्रयत्नही फसला.
त्यानंतर बेल यांच्या कोरिया रिपब्लिक संघाला गोल करण्याची संधी आयतीच चालून आली. पंचांनी व्हिएआर (वारचा) आधार घेत कोरिया रिपब्लिकला पेनल्टी किक बहाल केली होती. ऑस्ट्रेलियाची कॅटलिन फूर्ड हिने कोरिया रिपब्लिकच्या ली जेऊन मिन हिला गोलकक्षात अडथळा निर्माण केला होता. पण, चो सो ह्यून हिला ही संधी साधता आली नाही. तिने मारलेली किक लिडिया विल्यम्सच्या क्रॉसबारवरून बाहेर गेली.
पूर्वार्धात पेनल्टी हुकल्यानंतर उत्तरार्धात कोरिया रिपब्लिकच्या मुलींनी अधिक आत्मविश्‍वासाने खेळ केला. उत्तरार्धात खेळ सुरू झाल्यावर सहाव्याच मिनिटाला चोए यु री हिची किक ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक विल्यम्स हिने अप्रतिम अडवली. त्यानंतर चार मिनिटांनी सो ह्यून हिचे हेडर विल्यम्सनेच सुरेख अडवून कोरिया रिपब्लिकच्या आक्रमकांना निराश केले.
सामन्याला 15 मिनिटे बाकी शिल्लक असताना केर हिचे प्रयत्न फोल ठरत होते. तिचे अनेक प्रयत्न दिशाहीन होते. राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या कोर्टनी व्हिने हिने उजव्या बगलेतून सुरेख चाल रचून केर हिच्यासाठी चांगली जागा केली होती. मात्र, केर आज तिच्या लयीत नव्हती. तिची किक बाहेर गेली.
त्यानंतर सामन्याला दोन मिनिटे बाकी असताना जी हिने निर्णायक गोल मारला. मैदानात 30 यार्डावर त्याने चेंडूचा ताबा मिळविला. तेथून ती चेंडू घेऊन सुसाट निघाली. परिस्थितीच अंदाज घेत तिने उजव्या बाजूने जोरदार मारलेल्या किकने विल्यम्सला चकवले आणि चेंडू जाळीत गेला.

COMMENTS