Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाग्यश्री पेपर व जायंटसतर्फे 2 जूनला सामूहिक विवाह

छ. संभाजीनगर : आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या कुटुबांसाठी आणि अनावश्यक खर्चाला मात देण्यासाठी भाग्यश्री फाउंडेशन व जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीन

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
लस घेण्यास अनेकांकडून टाळाटाळ : आरोग्यमंत्री टोपे
शेत मालाला अधिक भाव मिळायला हवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

छ. संभाजीनगर : आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या कुटुबांसाठी आणि अनावश्यक खर्चाला मात देण्यासाठी भाग्यश्री फाउंडेशन व जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक विवाहाचे आयोजन रविवारी 2 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक जोडप्यांचा सामूहिक विवाह हिंदू धार्मिक पद्धतीने करण्यात येणार आहे. यापूर्वी वर्ष 2018 मध्ये 33 जोडप्यांच्या सामूहिक विवाह जायंटस प्राइड तर्फे यशस्वीरित्या करण्यात आला होता. वधू-वरास संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. यामध्ये गरजू, शेतकरी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त, मजूर प्रवर्ग इत्यादीना प्राधान्य देण्यात येईल असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे. सर्व इच्छुक वधू वर परिवारांनी ह्या सामूहिक विवाह कार्यक्रमात आपल्या मूलांचा विवाह करावा असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी गोपाल सारडा यांना मो. 9823012351 व सचिन चव्हाण मो. 7887888397 वर संपर्क साधावा व ह्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाग्यश्री फाउंडेशन व जायंट्स ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS