केज । प्रतिनिधीकेज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या स्थानिक विकास निधीतून शिरपुरा गावात विकासकामांचा धडाका सुरू

केज । प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या स्थानिक विकास निधीतून शिरपुरा गावात विकासकामांचा धडाका सुरू आहे. शिरपुरा येथील हनुमान वस्तीवरील हनुमान मंदिरासाठी सात लाख रुपयांचा खुला सभामंडप मंजूर करण्यात आला असून, आज या कामाचे थाटात भूमिपूजन संपन्न झाले.
विशेष म्हणजे, या विकासकामाचे भूमिपूजन कोणत्याही राजकीय नेत्याच्या हस्ते न करता गावातील ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आ. नमिताताई मुंदडा यांनी मतदारसंघातील धार्मिक व सामाजिक स्थळांच्या विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतला असून, शिरपुर्यातील या सभामंडपामुळे भाविकांची आणि ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सरपंच वशिष्ठ आण्णा घुले, कमलाकर सोनवणे, श्रीहरी सोनवणे, प्रभू आबा घुले, हनुमंत घुले, साईनाथ घुले, अशोक घुले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील नागरिकांनी आपल्या हस्ते भूमिपूजन केल्याने आमदार नमिताताई मुंदडा यांचे मनापासून आभार मानले.

COMMENTS