Homeताज्या बातम्यादेश

दुष्काळ-पुरमुक्तीसाठी हिरवळ एकमेव मार्ग

जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली/प्रतिनिधी : दुष्काळ आणि पुरापासून मुक्तीसाठी हिरवळ हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून हिरवळ वाढवण्याचे काम केले पाहिजे. समाजाने हेही समजून घे

चहाबाज नगरकर
पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
गणेश चतुर्थीपासून जिओ 5 जी फोन बाजारात येणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी : दुष्काळ आणि पुरापासून मुक्तीसाठी हिरवळ हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून हिरवळ वाढवण्याचे काम केले पाहिजे. समाजाने हेही समजून घेतले पाहिजे की, ज्या देशांनी आपल्या भूमीवर हिरवळ वाढवली तिथे समाजाच्या आरोग्यासोबत पृथ्वी अन पाण्याचे आरोग्य सुधारले आहे, असे आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
स्वीडनमध्ये 1972 मध्ये पहिली पृथ्वी शिखर परिषद झाली. स्वीडनने गेल्या 50 वर्षांमध्ये त्यांच्या जमिनीवरील जंगल दुप्पट केले आहे, असाही दाखला त्यांनी दिला. राजस्थानमधील गोपाळपुरा गावातून दुष्काळ-पूर लोक आयोगाच्या शोधयात्रेला 26 ऑगस्ट 2022 पासून सुरवात झाली होती. त्याचा पहिला टप्पा उर्लिकामधील जागतिक लोक आयोगाच्या कार्यालयात पूर्ण झाला. यावेळी डॉ. सिंह म्हणाले, गेल्या चार दशकात गोपाळपुरा गावात केलेल्या कामामुळे दुष्काळ आणि पुराने उध्दवस्त लोकांना परत आणले. परत आल्यावर लोकांनी आपली नैसर्गिक समृध्दी प्रस्थापित केली. शोधयात्रेतून बरेच निष्कर्ष पुढे आले आहेत. जगात पूर-दुष्काळ वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या जगण्यातले निसर्गाशी माणसाचे नाते तुटले आहे. आता मानवी शिक्षण तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी केवळ निसर्गाचे शोषण शिकवते. निसर्गाच्या शोषणामुळे जंगल, माती आणि निसर्गाशी असलेले प्रेमाचे नाते बिघडले आहे. त्यामुळे जंगले कमी होत आहेत. नद्यांच्या मुक्त प्रवाहाकडे जाणारे रस्ते अडवले आहेत. नैसर्गिक मार्गांवर अतिक्रमण आणि प्रदूषण वाढले आहे.

COMMENTS