Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 दिवाणी न्यायालय इमारतीच्या कामास प्रारंभाने मोठे समाधान : आ.काळे

कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणार्‍या अनेक शासकीय इमारती माजी आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात उभ्या केल्या असून, त्

कोंढवड येथील महिला बचतगटांना कर्जाचे वितरण
विधानसभा निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी आ.जगतापांच्या मागे उभे : अ‍ॅड.अभय आगरकर
Samgamner : तळेगाव दिघे मार्गावर पीकअपचा अपघात

कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणार्‍या अनेक शासकीय इमारती माजी आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात उभ्या केल्या असून, त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा देखील समावेश आहे. त्यांचा वारसा पुढे चालवितांना दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी देखील 28.21 कोटी निधी मिळविण्यात मला यश मिळाले. या निधीतून दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीच्या कामास प्रारंभ होत असल्याचे मोठे समाधान मिळाले. अशी प्रतिक्रिया देत या शुभारंभ कार्यक्रमास आ. आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या.  

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने विजयश्री प्राप्त केल्यानंतर बार असोसिएशनच्या सदस्यांनी सत्कार करून दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मोडकळीस आल्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे सांगत न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्‍न सोडवावा. अशी मागणी केली होती. ब्रिटीशकाळात बांधण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मुदतबाह्य झाल्यामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला असतांना देखील या ठिकाणी न्यायालयीन कामकाज करतांना येणार्‍या अडचणींची जाणीव झाली होती. त्याच वेळी दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी निधी देईल.असा शब्द बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांना दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी दिवाणी न्यायालय इमारत मुख्य अजेंड्यावर घेवून या इमारतीसाठी जास्तीतजास्त निधी कसा मिळविता येईल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होतो. त्या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आशीर्वाद लाभल्यामुळे या दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी 28.21 कोटी निधी मिळविण्यात मला यश मिळाले. रविवार,दि.10 पासून न्यायालयाच्या इमारतीच्या कामास प्रारंभ होत आहे याचे आत्मिक समाधान मिळत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले .–प्रतिक्रिया : दिवाणी न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतीमध्ये न्यायदानाचे काम करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याबाबत बार असोसिएशनच्या सदस्यांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे ईमारतीसाठी निधीची मागणी केली होती. आम्हाला कामकाज करतांना येणार्‍या अडचणी व आमच्या मागणीची आ.आशुतोष काळे यांनी गांभीर्याने दखल घेवून दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी 28.21 कोटी निधी देवून आमच्या मागणीला न्याय दिल्यामुळे इमारतीच्या कामास प्रारंभ होत असून बार असोसिएशनच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे जाहीर आभार.- अ‍ॅड.शंतनू धोर्डे (बार असोसिएशन सदस्य).

COMMENTS