Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरुषांनी समाजाला जोडण्याचे काम केले ः डॉ रफिक सय्यद

श्रीगोंदा शहर ः महापुरुषांनी समाजाला जोडण्याचे काम केले असून,े महापुरुषांची जयंती व रमजान ईद एकत्र येणे हा तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. महाप

आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे : डॉ.संजय घोगरे
केवळ 9 रुपयांत मिळवा एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग | | Lok News24
निळवंड्याच्या कथित तारणहाराला उशिरा का होईना उपरतीः विखे

श्रीगोंदा शहर ः महापुरुषांनी समाजाला जोडण्याचे काम केले असून,े महापुरुषांची जयंती व रमजान ईद एकत्र येणे हा तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. महापुरूषांची जयंती उत्सव सण म्हणून साजरे करावेत तरच आपापसातील भाईचारा व स्नेह वृध्दींगत होईल असे प्रतिपादन डॉक्टर रफिक सय्यद यांनी केले. सावित्री फातिमा विचार मंच-फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांचे वतीने श्रीगोंदा येथील सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या पटांगणात आयोजित पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य, सत्यशोधक, राष्ट्रपिता महात्मा फुले व महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्‍वरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर गुरू-शिष्य संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. सय्यद बोलत होते.
विधात्याने एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून जन्मास घातले आहे. आपण सर्व एकाच परमेश्‍वराची लेकरे आहोत. बंधू आहोत. फुले पैगंबरांचे गुणगान करतात तर पैगंबरांचे चरित्र जाणणे हे तुमचे कर्तव्य आहे. महापुरुषांची जयंती व रमजान ईद हा दुग्धशर्करा योग आहे. या निमित्ताने सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हे जयंती उत्सव साजरे करावयास हवे. कुठे आहेत त्या फातिमेच्या लेकी? कुठे आहेत महंमद महाराज तुकोबा, अनगडशा यांचे अनुयायी? शिवरायांनी रायगडावर मशिद बांधली ज्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते त्यांचे बांधव कुठे आहेत. त्यांना इतिहास माहित नाही, वास्तव माहित नाही ते म्हणतात देशांमध्ये जातीवाद, द्वेष, घृणा वाढत चालली आहे. याला तुम्ही कारणीभूत आहात असे सांगत डॉक्टर सय्यद पुढे म्हणाले फुलेंनी पैगंबरांवर जो पोवाडा लिहिला आहे तो तुम्ही समजावून सांगणे गरजेचे होते. ‘कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास जात प्रमादास गोडी गोडी गाढिला अधर्म सर्वात अभेद ठाम केला’म्हणजेच पैगंबरांनी अभेद ठाम केला आणि तुम्ही येत नाही, भेद करता असे सांगत मुस्लिम समाजाच्या तरुणांनीही अशा कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्याची व सत्य माहित करून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, इस्लामची शिकवण ही नाही पैगंबर म्हणतात तो मुस्लिमच नाही जो पोट भरून खाईल मात्र त्याचा शेजारी उपाशी राहील. भले तो कोणीही असो. तुमच्या वागण्यात पैगंबर कोठे आहेत. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी पैगंबर यांनी स्त्री उद्धारासाठी महान कार्य केले आहे .त्याकाळी मुलींना जिवंत जाळण्याची प्रथा होती ती बंद केली. लोकांना सत्य ते सांगितले . त्यानंतर मुलगी जन्माला आल्यावर माय-बाप दिवाळी साजरी करू लागले. ज्या प्रमाणे नमाज, रोजा सक्तीचे आहे त्याप्रमाणेच शिक्षण देखील सक्तीचे केले . त्याचे महत्त्व पटवून दिले. ज्यांनी आपल्या मुलींना शिकवले, वाढवले व योग्य वयात आल्यानंतर तिचे योग्य वराशी लग्न लावून दिले त्यांच्या स्वर्गाची मी हमी घेतो असा पैगंबरांनी वादा केला आहे. महिलांना संपत्तीत वारसा हक्क दिला, तिच्या संमतीशिवाय विवाह होणार नाही हा कायदा बनवला, तलाक चा अधिकार दिला. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे हा सन्मान स्री ला दिला. ज्योतीरावांनी पैगंबरांवर उगाच नाही जहाँमर्द महंमद हा पोवाडा लिहिला. महापुरुषांनी जोडायचे काम केले आहे आता तरी एकत्र या. दिवसेंदिवस परिस्थितीत बदल होत आहे एकोप्याची गरज आहे. आदेशा अनुसार संघटना, एकोप्याशिवाय तुम्ही मुस्लिमच नाही अशी तंबी देण्यासही ते विसरले नाहीत. तर या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व पाथरी येथील प्राध्यापक आर आर यादव यांनी संत कबीर, रविदास, नामदेव, चोखा, गोरा, सावता, सेना, नरहरी हे सर्व समतेला मानणारे संत असल्याचे सांगून ज्योती रावांनी शिवाजी महाराजांचा इतिहास शोधून लिहिला ज्योतिरावांनीशिवराय ही दिले. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले. सबाजीराव गायकवाड यांनी मदत केली. यांचा काय संबंध होता? शाहू राजांनी तर आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी जाताना आमच्या बहिणीला माहेरी पाठवा असे देखील सांगीतले याचा अर्थ काय? तर या सर्वच महापुरुषांचे फार मोठे योगदान आहे, आपल्यावर मोठे उपकार असल्याचे यावेळी डॉ. रफिक सय्यद यांनी सांगितले.

COMMENTS