Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चकलांबाच्या जन्मभूमीत निस्वार्थ सेवेची कृतज्ञ आठवण

एसटी कंडक्टर ते माजी सरपंच गणेश खेडकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरवचकलांबा । प्रतिनिधीगेवराई तालुक्यातील चकलांबा येथे माजी सरपंच तथा एसटी महामंडळाच

विज्ञानामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर विजय मिळवता येतो-डॉ.सुधिर येवले
रंगनाथ महाराज संस्थान, मादळमोही येथे धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात साजरा
Beed :.विद्यार्थ्यांनीचे प्रेत खांद्यावर घेऊन नातेवाईकांनी नदी केली पार (Video)

एसटी कंडक्टर ते माजी सरपंच गणेश खेडकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
चकलांबा । प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे माजी सरपंच तथा एसटी महामंडळाचे निवृत्त कंडक्टर गणेश उर्फ गणूआबा खेडकर यांचा सेवापूर्तीनिमित्त भव्य गौरव सोहळा दि. 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयकुमार घाडगे होते. सूत्रसंचालन संदीप रोकडे यांनी केले. यावेळी ह.भ.प. रामायणाचार्य एकनाथ महाराज गाढे यांनी गणूआबा खेडकर यांच्या निस्वार्थ सेवाभावाचे कौतुक करत, आता अधिक जोमाने गावाच्या सेवेत सक्रिय व्हा, गावाला तुमची गरज आहे, असे उद्गार काढले. राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर पदावर कार्यरत असताना प्रामाणिकपणा, वेळेचे काटेकोर पालन आणि प्रवाशांप्रती सौजन्यशील वर्तन या गुणांच्या बळावर गणेश खेडकर यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. ग्रामीण व शहरी मार्गांवर सेवा देताना प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन मदतीची भूमिका त्यांनी नेहमीच घेतली. प्रतिकूल परिस्थितीतही संयम व शिस्त राखून कर्तव्य बजावल्यामुळे प्रवासी तसेच सहकारी वर्गात त्यांचा विशेष सन्मान होता. एसटी सेवेसोबतच त्यांनी सरपंच पदाची जबाबदारीही अत्यंत प्रभावीपणे सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर विशेष भर देण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पारदर्शक कारभार, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि कोणताही पक्षपात न करता काम करण्याची भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची ओळख ठरली. या सेवापूर्ती सोहळ्यास चकलांबा व परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपल्या मनोगतातून गणूआबा यांच्याशी जोडलेले अनुभव व आठवणी सांगत त्यांचा गौरव केला. कार्यक्रमात गणेश खेडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नोकरी आणि लोकसेवा या दोन्ही जबाबदार्‍या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी नेहमी प्रयत्न केला, असे ते म्हणाले. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक उपक्रमांत सक्रिय राहून गावाच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. एकूणच हा सोहळा केवळ सेवानिवृत्तीचा कार्यक्रम न राहता, प्रामाणिक सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि लोकहिताचा आदर्श ठरला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS