आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्याने धान्य वितरण सुरळीत सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्याने धान्य वितरण सुरळीत सुरू

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत पात्र लाभार्थींची ई-पॉसद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तुंचे वितरण करण्यात येते. रा

दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर
नागपूर जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी
त्या दोन एनसीबीच्या अधिकार्‍यांची बडतर्फी

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत पात्र लाभार्थींची ई-पॉसद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तुंचे वितरण करण्यात येते. रास्तभाव दुकानातील ई-पॉस उपकरणांमध्ये मागच्या आठवड्यात आधार सर्व्हरमुळे तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे धान्य वितरण संथ गतीने होत होते. तथापि सदर तांत्रिक अडचण आता दूर झाली असून मागील 4 दिवसांपासून धान्य वितरण सुरळीत होत आहे. मागील 4 दिवसांमध्ये राज्यातील रास्तभाव दुकारातील ई-पॉसद्वारे 30.09 लक्ष व्यवहार झाले आहेत, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS