उल्हासनगर प्रतिनिधी - उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत पाहायला मिळतेय. दरम्यान, आता तर दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरट्याने
उल्हासनगर प्रतिनिधी – उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत पाहायला मिळतेय. दरम्यान, आता तर दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरट्याने हात साफ केलाय. रस्त्यावर कुणीच नाही, याचा गैरफायदा घेत या सोनसाखळी चोराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळ काढला. अवघ्या सहा सेकंदात ही चोरी करण्यात आली. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही थरारक घटना उल्हासनगरच्या खेमानी परिसरातील आहे. याप्रकरणी मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
COMMENTS