Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारा अटकेत

अहमदनगरमधून पुणे पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

अहमदनगर/प्रतिनिधी ः प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. गौतमी पाटील कपडे बदलत असतानाचा हा व्हिडीओ असल्याने राज्यात

परदेशातून येणार्‍या प्रवाशांना सक्तीचं क्वारंटाईन | DAINIK LOKMNTHAN
प्रशासकांच्या काळात सुमारे 50 कोटीची वसुली ; रेखी यांचा दावा, मार्चपर्यंत नगर अर्बन बँक नफ्यात आणण्याचा विश्‍वास
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या मध्य मंडळाध्यक्षपदी अशोक भोसले

अहमदनगर/प्रतिनिधी ः प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. गौतमी पाटील कपडे बदलत असतानाचा हा व्हिडीओ असल्याने राज्यात खळबळ माजली होती. दरम्यान याप्रकरणी पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून बुधवारी एकाला ताब्यात घेतले आहे. हा मुलगा अल्पवयीन आहे.
गौतमी पाटीलकडून लावणी सादर करताना अश्‍लील डान्स आणि अश्‍लील हावभाव होत असल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका होत असते. अनेक राजकीय नेत्यांनीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना विरोध केला आहे. त्यातच पुण्यात 24 फेब्रुवारीला गौतमी पाटीलचा एका कार्यक्रम पार पडला होता. पण हा कार्यक्रम गौतमी पाटीलच्या लावणीऐवजी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. गौतमी पाटीलचा या कार्यक्रमात एका अज्ञात व्यक्तीने कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट केला होता. इतकेच नाही तर हा त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली होती. गौतमी पाटीलसह नृत्य करणार्‍या एका मुलीने याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसंच सायबर पोलिसांकडेही याची तक्रार दाखल आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला होता. अखेर पोलिसाना तपासात यश मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी अल्पवयीन मुलगा असल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने हा व्हिडीओ व्हायरल केला होता. नगर जिल्ह्यातील एका शहरातून या मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. यामध्ये अन्य कोणाचाही सहभाग आहे का याची माहिती पोलिस घेत आहेत.

COMMENTS