कोपरगाव ः संपूर्ण राज्यातील दूध उत्पादक शेतकरी गेली अनेक दिवस दूध व्यवसाय तोट्यात असताना आपल्या गोमातेची सेवा करत आहे, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे द
कोपरगाव ः संपूर्ण राज्यातील दूध उत्पादक शेतकरी गेली अनेक दिवस दूध व्यवसाय तोट्यात असताना आपल्या गोमातेची सेवा करत आहे, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे दर मागील काही महिन्यांपासून बाविस रुपयांच्या खाली आलेले होते. अशा परिस्थितीतही शासनाने चारा व पशुखाद्यांचे दर कमी केले नाही. त्यामुळे राज्यभरातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असताना दूध दरवाढीसाठी अनेकांनी मोर्चे आंदोलने केले.
मोर्चे आंदोलने व लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव या कारणाने राज्य सरकारने दुध दरवाढ व अनुदानाचा निर्णय घेऊन पाच रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केले,परंतु ते अनुदान शासनाने अद्यापही दुध उत्पादकांना जमा केलेले नाही, तरी जाहीर केलेले अनुदान थेट दुध उत्पादक शेतक-यांच्या बॅक खात्यात कुठल्याही अटी शर्ती न घालता त्वरीत जमा करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे. शासन निर्णयात म्हटले होते की, राज्यातील खासगी तसेच सहकारी दुध संघांनी एक जुलै पासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रत असलेल्या दुधाला प्रती लिटर 30 रू. दर द्यावा व राज्य सरकार प्रति लिटर 5 रुपये अनुदान देईल, त्यानुसार राज्यातील बहुतांश दुध संघांनी शासन निर्णयानुसार दर देण्यास सुरुवात केली, मात्र राज्य शासनाने जाहीर केलेले 5 रुपये प्रति लिटर अनुदान शेतकर्यांना अद्यापही मिळालेले नाही,तरी ते लवकरात लवकर मिळावे अशे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
COMMENTS